डॉलरमध्ये तेजी आल्यामुळे सोने झाले स्वस्त; जाणून घ्या दहा ग्रॅमचा दर
मंगळवारी सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 46,047 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोने चांगलेच स्वस्त झाल्याने सोने खरेदीदारांना याचा मोठा फायदा झाला. (Gold rate became down as the dollar rallied; know the latest rates)
नवी दिल्ली : कोरोना महामारीचा सराफा बाजारातील परिणाम अजून तसाच आहे. आज जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. याचदरम्यान देशांतर्गत म्हणजेच स्थानिक पातळीवरही सोने-चांदीच्या किमतीत अशीच घट पाहायला मिळाली. सोने खरेदीदारांसाठी सोने खरेदी करण्याची चांगली संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. आज देशाची राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 264 रुपयांनी स्वस्त झाले. किमतीतील या घसरणीमुळे दिल्लीत आज सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 45,783 रुपये इतका होता. मंगळवारी सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 46,047 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोने चांगलेच स्वस्त झाल्याने सोने खरेदीदारांना याचा मोठा फायदा झाला. (Gold rate became down as the dollar rallied; know the latest rates)
याचदरम्यान दुसरीकडे चांदीच्या किंमतींमध्येही घसरण पाहायला मिळाली. भले सोन्याच्या तुलनेत चांदी अधिक स्वस्त झाली नाही, मात्र प्रति किलोच्या किमतीत 60 रुपयांचा फरक पाहायला मिळाला. चांदीच्या किमतीत झालेल्या 60 रुपयांच्या घसरणीमुळे प्रति किलोग्राम 67,472 रुपयांच्या पातळीवर चांदीचा बाजार बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोने आणि चांदीच्या दरामध्ये बऱ्यापैकी घसरण झाल्याचे चित्र होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने दर घसरणीसह 1759 डॉलर आणि चांदी 26 डॉलर प्रति आउंसच्या पातळीवर व्यापार करीत होती.
डॉलरमध्ये तेजी दिसून आल्यामुळे सोने-चांदीच्या दरात घसरण
सोने-चांदीच्या दरामधील घसरणीला डॉलरमध्ये दिसून आलेली तेजी कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट तपन पटेल यांनी याबाबत सांगितले की, डॉलरच्या दरात तेजी संचारल्यामुळे बुधवारी सोने दोन महिन्यांतील किमान पातळीवर आले. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या नवनीत दमाणी यांनीदेखील याच कारणाला दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते, डॉलरमध्ये संचारलेल्या तेजीमुळे सोने-चांदीच्या दराचे चित्र आणखी पालटेल. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने 1700 डॉलरच्या पातळीवर खाली येऊ शकते.
सोन्याच्या डिलिव्हरीचा दर
एमसीएक्सवर आज संध्याकाळी 6.25 वाजता ऑगस्टमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या दरात 25 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे या सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 46530 रुपयांच्या पातळीवर खाली आला होता. अशाच प्रकारे ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या दरात 15 रुपयांची घट झाली. या घसरणीमुळे ऑक्टोबर डिलिव्हरीवाल्या सोन्याचा दर आज 46850 रुपयांच्या पातळीवर होता. तसेच डिसेंबरच्या डिलिव्हरीचे सोने 336 रुपयांच्या तेजीसह प्रति दहा ग्राम 47500 रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत होते.
चांदी डिलिव्हरीचा दर
देशांतर्गत बाजारामध्ये चांदीच्या डिलिव्हरीमध्ये तेजीचे वातावरण दिसले. जुलैच्या डिलिव्हरीवाली चांदी 348 रुपयांच्या तेजीसह 67580 रुपयांच्या प्रति किलोग्राम पातळीवर व्यापार करीत होती. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या डिलिव्हरीवाली चांदी 208 रुपयांच्या तेजीसह 68482 रुपये प्रति किलोग्राम पातळीवर आणि डिसेंबरच्या डिलिव्हरीवाली चांदी 136 रुपयांच्या तेजीसह 69734 रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत होती. (Gold rate became down as the dollar rallied; know the latest rates)
आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय, संभाजी भिडेंचं वक्तव्य https://t.co/3NnapYsQ9N @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra #SambhajiBhide #coronavirus #AshadhiWari #Sangli #ShivPratishthan
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 30, 2021
इतर बातम्या
23 गावांच्या विकासासाठी 9 हजार कोटी रुपये द्या, पुण्याच्या महापौरांची राज्य सरकारकडे मागणी