सोने 55,000 रुपये तोळा होणार? काकू… मावश्यांनो आता दागिने खरेदी करण्यासाठी यादीच बनवा
शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सोन्यातही घसरण सुरू झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. येत्या काळात ही घसरण आणखी मोठी होऊ शकते. 10 ग्रॅम सोने फक्त 55000-56000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून सोन्यातही घसरण सुरू झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. येत्या काळात ही घसरण आणखी मोठी होऊ शकते. सोन्याच्या किंमतीबद्दलचा अंदाज खरा ठरला तर 10 ग्रॅम सोने फक्त 55000-56000 रुपयांपर्यंत पोहोचेल.
सोन्याचा आजचा भाव
आज सोन्याच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्यात 2700 रुपयांची घसरण झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोनं स्वस्त झालं आहे. याआधी 7 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 1929 रुपयांनी घसरून 89,085 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. 8 एप्रिल रोजी सोन्याचा भाव पाहिला तर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर जाहीर झालेल्या 24 कॅरेट ते 14 कॅरेट सोन्याचा भाव खालीलप्रमाणे आहे.
56000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते सोने!
आतापर्यंत सोने त्याच्या उच्च किंमतीमुळे चर्चेत राहिले आहे, परंतु आता सोन्याचा भाव 56000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. सोन्याची किंमत 56000 रुपयांच्या पातळीपर्यंत येऊ शकते, असा दावा केला जात आहे.
‘हा’ दावा कोणी केला?
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन मॉर्निंगस्टारच्या विश्लेषकाने हा अंदाज वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात 38 टक्क्यांची मोठी घसरण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. येत्या काही वर्षांत सोन्याची किंमत 3080 डॉलर प्रति औंसवरून 1820 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली येऊ शकते, असा दावा अमेरिकन तज्ज्ञ डॉन मिल्स यांनी केला आहे. म्हणजेच भारतात सोन्याचा भाव 55000-56000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो.
सोने का घसरणार?
पुरवठा वाढला: त्यांनी या अंदाजामागे एक मोठं कारण आणि सोन्याच्या किंमतीत सर्वात मोठी घसरण देखील सांगितली आहे. जागतिक स्तरावर सोन्याचे उत्पादन वाढले असून, त्यामुळे सोन्याचा साठा 9 टक्क्यांनी वाढला आहे. सोन्याचा पुरवठा वाढल्यास अतिरिक्त पुरवठा निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
मागणीत घट: पुरवठा वाढत असला तरी मागणीत सातत्याने घट होत आहे. सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे किरकोळ खरेदीही कमी होत आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती बँकांनी सातत्याने सोन्याची खरेदी केली असून, येत्या काळात त्यात घट होण्याची शक्यता आहे. मागणी घटल्याने सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते.
बाजारात सॅच्युरेशनची स्थिती: सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सॅच्युरेशनची परिस्थिती निर्माण होत आहे. 2024 मध्ये सोने क्षेत्रातील विलीनीकरण आणि अधिग्रहणात 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर गोल्ड ईटीएफमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे किमती घसरण्याची शक्यता वाढली आहे.
भविष्यवाणीशी सहमत नाही
हा अंदाज अनेक तज्ज्ञांना मान्य नाही. बँक ऑफ अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, पुढील दोन वर्षांत सोन्याचा भाव 3,500 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. तर गोल्डमन सॅक्सच्या मते या वर्षाच्या अखेरीस सोने 3300 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचेल. म्हणजेच भारतात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 90 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.