Gold price: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भावात किंचित वाढ, चांदीच्या भावात घसरण
Gold price | आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत अमेरिकन डॉलरमुळे आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. या आठवड्याच्या अखेरीस फेडरल रिझर्व्हच्या धोरणाच्या बैठकीपूर्वी, गुंतवणूकदार सावध आहेत. स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी घसरून $1,781.78 प्रति औंस झाले.
मुंबई: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. दिवाळीत सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांना चांगली संधी चालून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. त्याचे पडसाद भारतीय बाजारपेठेत उमटत आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) डिसेंबर फ्युचर्स सोन्याचा भाव 0.1 टक्क्यांनी वाढून 47,695 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 0.75 टक्क्यांनी घसरला होता. त्याचवेळी, धनत्रयोदशीपूर्वी, डिसेंबरच्या वायदेच्या चांदीच्या किमती प्रति किलो 0.16 टक्क्यांनी घसरल्या आहेत. सलग पाचव्या दिवशी चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
सोमवारी, MCX वर डिसेंबर फ्युचर्स सोन्याचा भाव 60 रुपयांनी वाढून 47,695 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याची किंमत 1781.78 डॉलर प्रति औंस झाली. त्याचवेळी, एमसीएक्सवर डिसेंबर फ्युचर्स चांदी 104 रुपयांनी घसरून 64,430 रुपये प्रतिकिलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 0.20 टक्क्यांनी घसरून 23.81 डॉलर प्रति औंस झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत अमेरिकन डॉलरमुळे आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. या आठवड्याच्या अखेरीस फेडरल रिझर्व्हच्या धोरणाच्या बैठकीपूर्वी, गुंतवणूकदार सावध आहेत. स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी घसरून $1,781.78 प्रति औंस झाले.
नवरात्रीनंतर बाजारात मागणी वाढली
ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष आशिष पेठे म्हणाले, नवरात्रीनंतर बाजारात मागणी दिसून येत आहे. तो धनत्रयोदशीलाही सुरू राहणार आहे. यंदा साथीचे रोग आटोक्यात आल्याने, सोन्याचे भाव खाली आले असून, लग्नसराईचा हंगाम तीव्र झाल्याने सणाविषयीची उत्सुकता कायम आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांतील विक्री संपूर्ण वर्षाच्या विक्रीत 40 टक्के योगदान देईल.
भविष्यात सोन्याचे भाव वाढणार का?
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, येत्या 12 महिन्यांत सोन्याचा भाव 52-53 हजारांपर्यंत पोहोचू शकतो. 2021 मध्ये आतापर्यंत सोन्याचा दर 47 हजार ते 49 हजाराच्या दरम्यान राहिला आहे. सोन्याचा एकूण प्रवास पाहता 2019 मध्ये सोन्याच्या दरात 52 टक्के आणि 2020 मध्ये 25 टक्के वाढ झाली होती.
अमेरिकन डॉलर आणि रोखे बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आर्थिक सुधारणांचा वेग अपेक्षेपेक्षा चांगला होता. त्यामुळे सोन्याबाबत गुंतवणूकदारांची उत्सुकता थंडावली होती. दुसऱ्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्था अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाही. अशा स्थितीत पुन्हा एकदा सोन्यामध्ये गुंतवणूक वाढून त्याची किंमत वाढण्यास सुरुवात होईल, असे कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत देशातील सोन्याच्या मागणीत वार्षिक तुलनेत 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण मागणी 139.10 टन इतकी होती. सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत हा आकडा 94.60 टन होता. याशिवाय दागिन्यांची मागणीही वार्षिक आधारावर58 टक्क्यांनी वाढून 96.20 टन झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत सोन्याचा दर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारात $2000 च्या पुढे जाईल.
संबंधित बातम्या:
दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव
Gold Today: सणाला मिळतेय सोन्याची साथ, ऐन दिवाळीत भावात घट, वाचा औरंगाबादचे भाव अन् लेटेस्ट ट्रेंड
गोल्ड स्कीममध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास काय होणार?