Today gold-silver rate : किमतीवर महागाईचा दबाव; सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा तेजी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
आज पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्या-चांदीचे भाव.
मुंबई : वाढत असलेली महागाई आणि बदलत असलेल्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज भारतात सोने-चांदीच्या भावात (Gold Sliver Price) वाढ झाली आहे. आज 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,390 रुपये एवढे असून, 24 कॅरट सोन्याचे (24 Carat Gold) दर प्रति तोळा 51700 रुपये एवढे आहेत. तर आज चांदीच्या दरात देखील तेजी पहायला मिळत असून, चांदीचे दर प्रति किलो 59,910 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात बुधवारी आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली होती. रेपो रेटमध्ये करण्यात आलेल्या वाढीचा परिणाम हा सोन्याच्या किमतीवर होताना दिसून येत आहे. रेपो रेट वाढीनंतर (Repo rate) सोन्याचे भाव स्थिर आहेत. आज देखील किंचित वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात चढ -उतार सुरू असल्याचे पहायल मिळत आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर तर दुसऱ्यांदा सायंकाळच्या वेळी त्यामुळे सोन्याच्या दरात अनेक ठिकाणी थोड्या-फार प्रमाणात तफावत आढळून येते. जाणून घेऊयात प्रमुख शहरातील सोन्या-चांदीचे दर
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47390 रुपये आहेत. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51700 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,220 रुपये एवढा आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51510 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर 47,220 रुपये ईतका आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51510 रुपये एवढा आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47390 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51700 रुपये एवढा आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47350 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51650 रुपये इतका आहे.
प्रमुख महानगरातील दर
- आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47390 रुपये एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51700 रुपये एवढा आहे.
- मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47390 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51700 रुपये एवढा आहे.
- कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47390 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51700 रुपये इतका आहे.
- भारतात सर्वात महाग सोने हे चेन्नईमध्ये असून, चेन्नईत 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,540 रुपये आहे, तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,870 रुपये एवढा आहे.
- तर आज चांदीचा दर प्रति किलो 59,910 रुपये इतका आहे.