AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold, silver prices: सोन्या, चांदीच्या दरात तेजी, सोन्यात 390 रुपयांची वाढ; तर चांदी 800 रुपयांनी वधारली

आज सोन्याच्या दरात (Gold, silver prices) पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून सोन्याचे (Gold) दर वाढत आहेत. गूड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53, 840 वर पोहोचले आहेत. तर 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा (दहा ग्राम) 49,350 रुपये एवढे झाले आहेत.

Gold, silver prices: सोन्या, चांदीच्या दरात तेजी, सोन्यात 390 रुपयांची वाढ; तर चांदी 800 रुपयांनी वधारली
आजचे सोन्याचे दर
| Updated on: Apr 14, 2022 | 2:50 PM
Share

आज सोन्याच्या दरात (Gold, silver prices) पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून सोन्याचे (Gold) दर वाढत आहेत. गूड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53, 840 वर पोहोचले आहेत. तर 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा (दहा ग्राम) 49,350 रुपये एवढे झाले आहेत. बुधवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53,450 रुपये इतके होते. तर 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 49,000 हजार रुपये होता. याचाच अर्थ आज बुधवारच्या तुलनेमध्ये 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा 350 रुपयांची तर 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति ग्राम 390 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या (silver) दरात देखील वाढ झाली असून, आज चांदी प्रति किलो 67 हजार 800 रुपयांवर पोहोचली आहे. बुधवारी चांदीचा दर प्रति किलो 67 हजार रुपये एवढा होता. आज तिच्यामध्ये 800 रुपयांची वाढ झाली आहे.

राज्यातील आजचे दर

गुड रिटर्न्स बेवसाईटनुसार आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 49,350 एवढी आहे. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53, 840 वर पोहोचले आहेत. पुण्यात प्रति दाह ग्रॅम 22 कॅरट सोन्याचे दर 49 हजार 400 रुपये तर 24 कॅरट सोन्याचे दर 53 हजार 890 वर पोहोचले आहेत. नागपूरमध्ये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरट सोन्याचे दर 49 हजार 400 रुपये तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53 हजार 890 वर पोहोचले आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील सातशे रुपयांयी वाढ झाली असून, चादी 67 हजार 800 रुपयांवर पोहोचली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी वाढ

सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात किंचीत वाढ पहायला मिळत होती. मात्र बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात तीनशे रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली. तर आज म्हणजे गुरुवारी 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा 350 रुपयांची तर 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति ग्राम 390 रुपयांची वाढ झाली आहे. चांदी देखील सातशे रुपयांनी वधारली असून, ती 67 हजार 800 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोन्याचे दर वाढत असताना देखील सोन्यातील गुंतवणूक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

Mumbai Stock Exchange : शेअर बाजार आजपासून चार दिवस बंद, वर्षातील सर्वात मोठी सुटी; ‘या’ कारणामुळे उलाढाल ठप्प

कंपनीच्या एका डीलने गुंतवणूकदारांना केले मालामाल, थरमॅक्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात 15 टक्क्यांची वाढ

Crypto Credit Card : जगातील पहिले क्रिप्टो क्रेडिट कार्ड बाजारात; बिनव्याजी करा वापर

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.