Today Gold Silver Price: आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात तेजी, चांदी सत्तर हजारांवर, चेक करा तोळ्या तोळ्याचा भाव
: सोन्याच्या (Gold) दरात तेजी सुरूच असून आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वधारले आहेत. चांदीच्या दरामध्ये देखील वाढ दिसून येत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर (Gold Price) प्रति तोळा 49860 रुपयांवर पोहोचले आहेत.
Gold Silver Price Today : सोन्याच्या (Gold) दरात तेजी सुरूच असून आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वधारले आहेत. चांदीच्या दरामध्ये देखील वाढ दिसून येत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर (Gold Price) प्रति तोळा 49860 रुपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी सोन्याचे दर प्रति तोळा 49550 रुपये इतके होते. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरात प्रति तोळा 340 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे 24 कॅरट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 54390 रुपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 53,454 रुपये प्रति तोळा इतके होते. चांदीच्या भावात (Silver Price) तेजी दिसत असून, चांदी प्रति किलो सत्तर हजारांवर पोहोचली आहे. सोमवारी चांदीचे दर 69,923 रुपये होते. चांदीच्या दरात आज किलोमागे 67 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्या चांदीचे भाव हे दिवसातून दोनदा बदलतात. सकाळी मार्केट सुरू होताच भाव जाहीर होतात. तर दुसऱ्यांदा सायंकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा एकदा भाव जाहीर केले जातात.
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याचे दर वधारले आहेत, तर चांदीच्या भावात देखील किंचित वाढ दिसून येत आहे. आज राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर 49860 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर 54390 रुपये एवढे आहेत. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर 49890 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचे दर 54470 रुपये एवढे आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर 49890 रुपये तर 24 कॅरट सोन्याचे दर 54470 रुपये एवढे आहेत. चांदीचे दर आज प्रति किलो सत्तर हजारांवर पोहोचले आहेत.
2022 मध्ये सोन्याच्या दरात तेजी
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी 2022 पासून ते आतापर्यंत सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे जवळपास चार हजारांची वाढ झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 45 हजारांच्या आसपास होते. आज 22 कॅरट सोन्याचे दर 49 हजारांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात तेजी दिसत असल्याने गुंतवणूक देखील वाढली आहे. अनेक जण सोन्यामधील गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याने सोन्याचे भाव देखील वाढले आहेत. दरम्यान मागणी वाढल्याने पुढील काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
RBI report: जागतिक घडामोडींचा प्रतिकूल परिणाम, मात्र भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत – आरबीआय
Share Market Updates : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात किंचित तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा