Gold latest price : सोने-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव किंचित घसरून 1776 डॉलरच्या पातळीवर होता. यावेळी चांदीही 26 डॉलरच्या स्तरावर थोडी घसरणीसह व्यापार करीत होती. (Gold-silver prices increase today, know the price of ten grams of gold)
मुंबई Gold rate today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव 116 रुपयांनी व चांदीचा भाव 161 रुपयांनी वधारला. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 46,337 रुपयांवर बंद झाला. या आधीच्या व्यापार सत्रात सोन्याचा भाव 46,221 रुपयांवर बंद झाला होता. चांदी 161 रुपयांनी वधारुन 67,015 रुपये प्रति किलोवर बंद झाली. मागील व्यापार सत्रात चांदीचा भाव 66,854 रुपयांवर बंद झाला होता. सुरुवातीच्या व्यापारात रुपया डॉलरच्या तुलनेत 6 पैशांनी घसरला होता. बाजार बंद होताच 1 पैशांच्या मजबूतीसह 74.19 च्या स्तरावर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव किंचित घसरून 1776 डॉलरच्या पातळीवर होता. यावेळी चांदीही 26 डॉलरच्या स्तरावर थोडी घसरणीसह व्यापार करीत होती. (Gold-silver prices increase today, know the price of ten grams of gold)
सोने वितरण दर
देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सायंकाळी 5.21 वाजता ऑगस्ट डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 6 रुपयांनी वाढून 46931 रुपये प्रति दहा ग्रॅम व ऑक्टोबरमध्ये सोन्याचा भाव 20 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 47229 रुपये स्तरावर व्यापार करीत होता.
चांदी वितरण दर
चांदीबद्दल बोलताना, यावेळी एमसीएक्सवर किंचित घसरण दिसून येत आहे. जुलैच्या डिलीव्हरीसाठी चांदीचा दर 96 रुपयांनी घसरून 67777 रुपये प्रति किलो राहिला, सप्टेंबरच्या डिलीव्हरीसाठी चांदी 80 रुपयांनी घसरून 68870 रुपये प्रति किलो आणि डिसेंबरच्या वितरणासाठी चांदी 515 रुपयांनी घसरून 70353 रुपये प्रति किलो स्तरावर व्यापार करीत होती.
IBJA वर 24 कॅरेट सोन्याची किंमत
इंडियन बुली ज्वेलर्स असोसिएशन अर्थात आयबीजेएच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅम 47089 रुपये आणि चांदी 68204 रुपये प्रति किलो आहे. डॉलरच्या निर्देशांकात आज वाढ दिसून येत आहे. सध्या तो +0.146 अंकांच्या वाढीसह 91.990 च्या पातळीवर आहे. कच्च्या तेलाच्या रेड मार्कवर व्यापार करत होता. यावेळी, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75.21 डॉलर पातळीवर होती. (Gold-silver prices increase today, know the price of ten grams of gold)
दरमहा कमाईचा सर्वात सोपा मार्ग; 50 हजार रुपयांपर्यंत मिळेल व्याजhttps://t.co/45qweI5g1h#mutualFund |#return |#interest |#investment
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2021
इतर बातम्या
Video : लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी! औरंगाबादच्या वाळूजमध्ये नागरिकांचे मोठे हाल
बहुप्रतीक्षित Skoda Kushaq भारतात लाँच, दमदार फीचर्ससह SUV बाजारात, किंमत…