Gold Silver Rate Today News | चांदी लकाकली, सोने ही चमकले, आठवड्याच्या शेवटी भाव वधरले

Gold Silver Rate Today News | सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोने सलग दोन दिवस आपटले. त्यामुळे सणाच्या तोंडावर सोन्यातील ही घसरण गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरली. पण डॉलरच्या मजबुतीने रुपयाला घोर लागला.

Gold Silver Rate Today News | चांदी लकाकली, सोने ही चमकले, आठवड्याच्या शेवटी भाव वधरले
भाव वधरलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 1:09 PM

Gold Silver Rate Today | सप्टेंबर महिन्याच्या (September Month) सुरुवातीला सोने दणकावून पडले. सोन्याच्या आपटी बॉम्बमुळे बाजार हादरला. सणाच्या तोंडावर गुंतवणूकदारांसाठी ही आनंदवार्ता ठरली. भावात अशीच घसरण होत राहिल असा अंदाजही व्यक्त करण्यात येत होता. पण दुसरीकडे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या (American Federal Bank)आक्रमक धोरणांमुळे डॉलर मजबूत होत आहे. त्याचा परिणाम रुपयावर मध्यंतरी चांगलाच शेकला होता. रुपयाची घसरण सरकारची डोकेदुखी ठरली आहे. रुपया थोडाफार वधरला आहे. रुपयाची पडझड रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अमेरिकन बँक व्याजदर 75 बेसिक पॉईंटपर्यंत वाढवू शकतो. आज जागतिक स्तरावर शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. डॉलर दिवसागणिक मजबूत होत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतींवर (Gold Silver Price Today News) दिसून येत आहे. आज 3 सप्टेंबर, शनिवारी सोने आणि चांदीचे भाव वधरले आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today News) आज वाढ झाली. 3 सप्टेंबर रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,650 रुपये झाला आहे. यामध्ये 250 रुपयांची भाव वाढ झाली. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,890 रुपये आहे. यामध्ये 270 रुपयांची वाढ झाली. तर चांदीचा आजचा भाव एका किलोसाठी 52,500 रुपये इतका आहे. चांदीत 200 रुपयांनी भाव वाढले.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,650 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,890 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,680 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,920 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,680 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,920 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,680 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 50,920 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 525 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

हे सुद्धा वाचा

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.  सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.