SBI : एसबीआयच्या ग्राहकांसाठी खुषखबर, आता या सेवेवर शुल्क माफ..
SBI : एसबीआयच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. त्यांना आता या सेवेसाठी कुठलेही शुल्क मोजावे लागणार नाही. कोणतीही आहे ही सेवा..
मुंबई : भारतातील तिसरी सर्वात मोठी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. SBI ग्राहकांसाठी अनेक सेवा (Services) सुरु केल्या आहेत. त्यासाठी बँक काही शुल्क (Charges) ही आकारते. त्यामुळे ग्राहकांचा खिसा खाली होतो.
मोबाईलद्वारे तुम्ही रक्कम हस्तांतरीत करत असाल, कोणाला रक्कम पाठवत असाल तर एसएमएससाठी शुल्क (SMS Charges) आकारण्यात येत होते. पण आता तुम्हाला शुल्क द्यावे लागणार नाही. बँकेने एसएमएस सेवा निःशुल्क केली आहे.
यूएसएसडी(USSD) सेवांचा उपयोग करुन ग्राहकांना एसएमएस सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या सेवेसाठी पूर्वी जे अतिरिक्त शुल्क द्यावे लागत होते. ते देण्याची आता गरज नाही.
मोबाईल फंड ट्रांसफर करण्यासाठी आता एसएमएस शुल्क माफ करण्यात आल्याची माहिती एसबीआयने ट्विट करुन दिली आहे. या सेवेचा ग्राहक आता विना मोबदला लाभ घेऊ शकतात.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना *99# डायल करावे लागेल .त्यानंतर या सेवेसाठी त्यांना कुठलेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
यामुळे रक्कम हस्तांतरण, रिक्वेस्ट मनी, खात्यातील शिल्लक रक्कम, मिनी स्टेटमेंट आणि युपीआय पिन बदलणे यासाठी एमएसएसवर कुठलेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
फीचर फोन असणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. एसएमएससाठी त्यांना ज्यादा वा अतिरिक्त रक्कम देण्याची गरज राहणार नाही. कारण बँकेने एसएमएस सेवा पूर्णतः निःशुल्क केली आहे.
एसबीआयकडे सध्या एक अरबहून अधिक मोबाईलधारकांनी नोंदणी केली आहे. त्यातील 65 टक्के मोबाईलधारकांकडे फीचर फोन आहेत. त्यांना या सेवेचा आता मोफत लाभ घेता येईल.