बँकेत सेव्हिंग अकाऊंट नसेल तरी FD मध्ये गुंतवता येतील पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Fixed Deposit | इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेच्या एका वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 6.35 टक्के इतके व्याज मिळेल. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल
मुंबई: समजा एखाद्या बँकेत तुमचे बचत खाते (Saving Account) नसेल तरी तुम्ही संबंधित बँकेच्या मुदत ठेव योजनेत (Fixed Depostie Scheme) पैसे गुंतवू शकता. तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’च्या माध्यमातून ही नवी सोय उपलब्ध होणार आहे. बँका आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्थांप्रमाणे आता गुगलनेही मुदत ठेव योजना (Fixed Deposite Scheme) सुरु केली आहे. केवळ भारतातील ग्राहकांसाठी गुगलने ही योजना सुरु केली आहे. त्यानुसार ग्राहक Google Pay च्या माध्यमातून FD खरेदी करु शकतील. सेतू या फिनटेक कंपनीच्या साहाय्याने गुगलने ही योजना सुरु केली आहे.
या कंपनीच्या एपीआयच्या माध्यमातून गुगल ग्राहकांना मुदत ठेवीची सेवा देईल. मात्र, गुगल स्वत: ही स्कीम विकणार नाही. तर अन्य बँकांच्या एफडी ‘गुगल पे’च्या माध्यमातून थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देईल. यामध्ये सुरुवातीला इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेची मुदत ठेव योजना ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.
किती व्याज मिळणार?
इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेच्या एका वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 6.35 टक्के इतके व्याज मिळेल. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. त्यासाठी सेतू कंपनीने एपीआयचे बीटा व्हर्जन तयार केले आहे. त्यामुळे आता लवकरच ही योजना ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.
मोबाईलवरुन फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवा
गुगलच्या या नव्या सेवेमुळे आता तुम्ही आपल्या स्मार्टफोनवरुनही मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवू शकता. सर्व प्रक्रिया स्मार्टफोनवरच पार पडणार असल्याने ही एक मोठी गोष्ट मानली जात आहे. त्यामुळे भविष्यात ग्राहकांना फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायचे असल्यास बँकेत जावे लागणार नाही. तुम्हाला थेट मोबाईल वॉलेटमधून पैसे फिक्स्ड डिपॉझिट योजनेत ट्रान्सफर करता येतील. विशेष म्हणजे FD काढण्यासाठी इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेत तुमचे खाते असणेही गरजेचे नाही.
लवकरच अन्य बँकांसोबतही टायअप
फिक्स डिपॉझिट योजनेसाठी गुगलकडून अन्य बँकांशीही बोलणी सुरु आहेत. ‘गुगल पे’च्या माध्यमातून तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवून पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पैसे थेट तुमच्या गुगल पे अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जातील. त्यामुळे तुम्हाला गुगल पे वगळता बँकांशी थेट संपर्क करावा लागणार नाही. आगामी काळात ‘गुगल पे’ वर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट योजना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Google Pay चे 15 कोटी युजर्स
सध्या भारतात तब्बल 15 कोटी लोक Google Pay चा वापर करतात. ‘गुगल पे’ कडून 7 ते 29 दिवस, 30 ते 45 दिवस, 91 ते 180 दिवस, 181 ते 364 दिवस अशा कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करण्यात येतील.
इतर बातम्या:
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा गोठणार का? जाणून घ्या आजचा दर
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव पुन्हा कडाडले, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
पेट्रोल-डिझेल चढ्या दरात विकून इंडियन ऑईलने किती नफा कमावला?