आता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार; एका वर्षासाठी किती व्याज मिळणार?

Google pay FD | अन्य बँकांच्या एफडी 'गुगल पे'च्या माध्यमातून थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देईल. यामध्ये सुरुवातीला इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेची मुदत ठेव योजना ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

आता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार; एका वर्षासाठी किती व्याज मिळणार?
गुगल पे
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 7:39 AM

मुंबई: बँका आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्थांप्रमाणे आता गुगलनेही मुदत ठेव योजना (Fixed Deposite Scheme) सुरु केली आहे. केवळ भारतातील ग्राहकांसाठी गुगलने ही योजना सुरु केली आहे. त्यानुसार ग्राहक Google Pay च्या माध्यमातून FD खरेदी करु शकतील. सेतू या फिनटेक कंपनीच्या साहाय्याने गुगलने ही योजना सुरु केली आहे.

या कंपनीच्या एपीआयच्या माध्यमातून गुगल ग्राहकांना मुदत ठेवीची सेवा देईल. मात्र, गुगल स्वत: ही स्कीम विकणार नाही. तर अन्य बँकांच्या एफडी ‘गुगल पे’च्या माध्यमातून थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देईल. यामध्ये सुरुवातीला इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेची मुदत ठेव योजना ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

किती व्याज मिळणार?

इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेच्या एका वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 6.35 टक्के इतके व्याज मिळेल. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. त्यासाठी सेतू कंपनीने एपीआयचे बीटा व्हर्जन तयार केले आहे. त्यामुळे आता लवकरच ही योजना ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

मोबाईलवरुन फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवा

गुगलच्या या नव्या सेवेमुळे आता तुम्ही आपल्या स्मार्टफोनवरुनही मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवू शकता. सर्व प्रक्रिया स्मार्टफोनवरच पार पडणार असल्याने ही एक मोठी गोष्ट मानली जात आहे. त्यामुळे भविष्यात ग्राहकांना फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायचे असल्यास बँकेत जावे लागणार नाही. तुम्हाला थेट मोबाईल वॉलेटमधून पैसे फिक्स्ड डिपॉझिट योजनेत ट्रान्सफर करता येतील. विशेष म्हणजे FD काढण्यासाठी इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेत तुमचे खाते असणेही गरजेचे नाही.

लवकरच अन्य बँकांसोबतही टायअप

फिक्स डिपॉझिट योजनेसाठी गुगलकडून अन्य बँकांशीही बोलणी सुरु आहेत. ‘गुगल पे’च्या माध्यमातून तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवून पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पैसे थेट तुमच्या गुगल पे अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जातील. त्यामुळे तुम्हाला गुगल पे वगळता बँकांशी थेट संपर्क करावा लागणार नाही. आगामी काळात ‘गुगल पे’ वर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट योजना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Google Pay चे 15 कोटी युजर्स

सध्या भारतात तब्बल 15 कोटी लोक Google Pay चा वापर करतात. ‘गुगल पे’ कडून 7 ते 29 दिवस, 30 ते 45 दिवस, 91 ते 180 दिवस, 181 ते 364 दिवस अशा कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करण्यात येतील.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.