Crop Insurance Scheme : पावसाने झाले पिकांचे नुकसान.. या सरकारी योजनेतून होईल भरपाई..
Crop Insurance Scheme : देशातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले. अशावेळी या योजनेतून शेतकरी सरकारकडे नुकसान भरपाईसाठी दाद मागू शकतो.
नवी दिल्ली : यंदा देशाच्या काही भागात पावसाने जोरदार (Heavy Rain) बॅटिंग केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे (Farmers) हातचे पीक (Crop) गेले आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तरीही चिंता करण्याचे काम नाही. ही योजना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Compensation)देईल.
ही योजना सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाची आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत (Crop Insurance Scheme) शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई सरकार करते.
या योजनेतंर्गत आवर्षण, अवकाळी पाऊस, बेमौसमी पाऊस, पूर आदींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येते. ज्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत नोंदणी केली आहे. त्यांना भरपाई मिळते.
नैसर्गिक आपत्तीत या विमा योजनेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. आतापर्यंत जवळपास 36 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
देशातील शेतकरी किसान पीएम फसल बीमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हा अर्ज करता येतो.
शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास त्यांना या योजनेचे संकेतस्थळ, https://pmfby.gov.in ला भेट द्यावी लागेल. याठिकाणी सर्व विहित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
तर ऑफलाईन अर्ज जवळच्या बँक, सहकारी बँका, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC)या ठिकाणी उपलब्ध आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी पेरणीच्या 10 दिवस अगोदर अर्ज सादर करावा लागतो.
नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना कंपनीला याची माहिती द्यावी लागेल. त्यासाठी 72 तासांचा कालावधी देण्यात आला आहे. त्याच काळात विमा कंपनीला कळवावे लागेल .
पंचनामा झाल्यानंतर अंदाजित नुकसानीचा आकडा नोंदवण्यात येतो. पिकांचे किती नुकसान झाले याचा अंदाज बांधण्यात येतो. भरपाईची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा करण्यात येते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी राशन कार्ड, बँक खाते, आधार क्रमांक आवश्यक आहे. पासपोर्ट फोटो, शेतीचा खासरा क्रमांक, रहिवाशी दाखला(वाहन परवाना, मतदान ओळखपत्र), आदी कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे.