AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: महागाईमुळे मुंबईकरांचं बजेट कोलमडणार; सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ

CNG PNG Rate | काही दिवसांपूर्वी दिल्लीसह उत्तर भारतात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. दिल्लीत शनिवारपासून सीएनजीच्या दरात 2.28 रुपये, तर नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडात सीएनजीचा दर किलोमागे 2.55 रुपयांनी वाढला. तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसच्या दरातही 2.10 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती.

मोठी बातमी: महागाईमुळे मुंबईकरांचं बजेट कोलमडणार; सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ
सीएनजीच्या दरात वाढ
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 9:28 AM
Share

मुंबई: नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किमतीत केंद्र सरकारने 62 टक्के वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडनेही पीएनजी आणि सीएनजीच्या दरांत अनुक्रमे प्रतिएकक व प्रति किलो दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर 49.40 रुपये इतका आहे.

केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमतीत केलेल्या वाढीमुळे वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि प्रमुख शहरांमध्ये घरगुती वापरासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याचाच भाग म्हणून महानगरकडूनह पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली. मुंबईतील अनेक वाहने सीएनजीवर चालतात. त्यामुळे वाहतुकीच्या भाडेदरात वाढ होऊ शकते. तसेच पीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे सामान्यांचे किचन बजेट कोलमडू शकते.

काही दिवसांपूर्वी दिल्लीसह उत्तर भारतात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. दिल्लीत शनिवारपासून सीएनजीच्या दरात 2.28 रुपये, तर नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडात सीएनजीचा दर किलोमागे 2.55 रुपयांनी वाढला. तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसच्या दरातही 2.10 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती.

यापूर्वी जुलै महिन्यात मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 2.58 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 55 पैशांची वाढ केली होती. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले होते.

सीएनजी दरात वाढ का?

देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले. पूर्वीचा अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका होता. 1 ऑक्टोबरपासून हे दर वाढवण्यात आले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमतही ऑक्टोबरपासून वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

काय परिणाम होणार?

मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरुन नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या:

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल एलपीजीच्या किंमतीत वाढ

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.