Home Loan : गृहकर्ज महागले, घराचं स्वप्न आवाक्याबाहेर?; जाणून घ्या प्रमुख बँकांचे कर्जदर

कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणाऱ्या व्यक्तींच्या ईएमआयमध्ये थेट वाढ होते. रेपो दरात वाढ केल्यामुळे रेपो दराशी संबंधित गृहकर्ज देखील महागणार आहे. विविध बँकांचे एमसीएलआर जाणून घेऊया

Home Loan : गृहकर्ज महागले, घराचं स्वप्न आवाक्याबाहेर?; जाणून घ्या प्रमुख बँकांचे कर्जदर
गृह कर्जImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 10:43 PM

नवी दिल्ली : वाढत्या महागाईला ब्रेक लावण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve bank of India) आर्थिक तिमाही पतधोरणाची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात 50 बेसिस अंकांनी वाढ करण्याच्या निर्णय घेतला आहे. रेपो दरात 50 बेसिस अंकांनी वाढ केल्यानंतर सुधारित रेपो दर 4.4 टक्क्यांवरुन 4.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर (Repo rate) वाढीमुळं सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी कर्ज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएलआर (MCLR) मध्ये वाढ केल्यामुळे वैयक्तिक, व्यावसायिक, वाहन, गृह सर्वप्रकारचे कर्ज महागणार आहेत. एमसीएलआर मध्ये वाढ केल्यानंतर त्याचा थेट परिणाम ईएमआय वर होतो. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणाऱ्या व्यक्तींच्या ईएमआयमध्ये थेट वाढ होते. रेपो दरात वाढ केल्यामुळे रेपो दराशी संबंधित गृहकर्ज देखील महागणार आहे. विविध बँकांचे एमसीएलआर जाणून घेऊया

आयसीआयसीआय बँक

खासगी क्षेत्रातील वित्तपुरवठा करणाऱ्या बँकेने नवीन कर्जदर 1 जून 2022 पासून लागू केले आहेत.

· 1 महिना- 7.30 टक्के

· 3 महिना- 7.35 टक्के

· 6 महिना- 7.50 टक्के

· 1 वर्ष- 7.55 टक्के

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेचे एमसीएलआर 7 जून 2022 पासून लागू असतील.

· 1 महिना- 7.55 टक्के

· 3 महिना- 7.60 टक्के

· 6 महिने- 7.70 टक्के

· 1 वर्ष – 7.85 टक्के

· 2 वर्ष- 7.95 टक्के

· 3 वर्ष- 8.05 टक्के

बँक ऑफ बडौदा

· 1 महिना – 7.20 टक्के

· 3 महिना- 7.25 टक्के

· 6 महिना- 7.35 टक्के

· 1 वर्ष- 7.50 टक्के

बँक ऑफ महाराष्ट्र

· 1 महिना – 7.25 टक्के

· 3 महिना- 7.55 टक्के

· 6 महिना- 7.60 टक्के

· 1 वर्ष- 7.70 टक्के

एमसीएलआर म्हणजे काय?

MCLR ही निधी-आधारित कर्ज दराची सीमांत किंमत (Marginal Costs of Fund-Based Lending Rate) मानली जाते. कर्ज देण्यापूर्वी बँकांद्वारे ग्राहकांकडून आकारण्यात येणारा किमान व्याजदर ठरतो. सर्व बँकांच्या कर्ज दरात सुसूत्रता असावी या हेतूने रिझर्व्ह बँकेने एमसीएलआरची निश्चिती केली आहे. आरबीआय अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या सर्व बँकांना एमसीएलआरची अंमलबजावणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.