Housing Sale : स्वप्नातील इमल्याला महागाईचा सुरुंग! चालू आर्थिक वर्षात घरांच्या किंमती वाढणार
चालू आर्थिक वर्षात घरांच्या किमती 8 टक्क्यांनी वाढणार आहेत. शेवटच्या घटकांकडून मागणी वाढल्यामुळे मागणीत वृद्धी झाल्याचा अंदाज इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने व्यक्त केला आहे.
मुंबई : सर्वसामान्यांच्या स्वप्नातील इमल्याला महागाईचा सुरुंग लागणार आहे. चालू आर्थिक वर्षात घरांच्या (Housing) किमती आठ टक्क्यांनी वाढणार आहेत. शेवटच्या घटकांकडून मागणी(Demand) वाढल्यामुळे ही वृद्धी झाल्याचा अंदाज इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने व्यक्त केला आहे. रेटिंग एजन्सीने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, घरांच्या विक्रीतील (Housing Sale) वाढ आणि वाढती मागणी ही समाजातील शेवटच्या घटकामुळे झाली आहे. त्यामुळे भाववाढ (Price Increase) शाश्वत असून ती वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात संपूर्ण देशभरात घरांच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या होत्या. तसेच आतापर्यंत घरांच्या विक्रीत वाढ झाल्याने भारतातील भावही तितक्या वेगाने वाढलेले नाहीत.
इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2022-23 या आर्थिक वर्षात निवासी मालमत्तेच्या किंमतीत वाढ होण्याची एजन्सीची अपेक्षा आहे. बेंगळुरू, मुंबई, पुणे आणि हैदराबादच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाच्या पातळीवर ही वाढ आठ टक्क्यांच्या आसपास असेल.
घरांच्या विक्रीत 12 टक्क्यांनी वाढ : रिपोर्ट
एजन्सीच्या मते, चालू आर्थिक वर्षात वर्षागणिक घरांच्या विक्रीत सुमारे 12 टक्के वाढ होईल. याशिवाय, ‘ICRA’ या पतमानांकन संस्थेने निवासी मालमत्तांबाबतच्या दृष्टिकोनाचा आढावा घेऊन चालू आर्थिक वर्षात घर विक्रीत नकारात्मक स्थिती असल्याचा दावा केला आहे. असे असले तरी शेवटच्या घटकांच्या मागणीमुळे त्यात वाढ होत आहे देशाच्या अनेक भागांत घरांच्या मागणीत हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे. त्याचबरोबर यंदा घरांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी गृहकर्जेही महाग होऊ शकतात, असे संकेत आहेत. तरी या क्षेत्रात स्थैर्य कायम राहणार असल्याचे पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.
घरांच्या विक्रीत अनेक वर्षांतील उच्चांक गाठण्यमागे, परवडणाऱ्या घरांचा वाढता वाटा, गृहकर्जाचे व्याजदर विक्रमी नीचांकी पातळीवर असणे अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे मागणीत वृद्धी झाल्याचा दावा ICRA ने केला आहे. भारतीयांचा स्वत:चे घर घेण्याचा विचार सातत्याने वाढत असल्याचे इक्राने म्हटले आहे. त्यामुळे मागणीत वृद्धी होत आहे.
साहित्य महाग, स्वप्नाला सुरुंग
खरं तर घर बांधण्यासाठी वापरण्यात येणारी प्रत्येक गोष्ट गेल्या वर्षभरात महाग झाली आहे. सिमेंट, सारिया, तांबे, अॅल्युमिनियम . सर्वांच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात सिमेंट 22 टक्के महाग झालं आहे. स्टीलच्या किमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तांबे आणि अॅल्युमिनिअमच्या किंमतीनी गेला वर्षभरातील विक्रम मोडीत काढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे वाहतुकीचा खर्च वाढला असून आता कामगारांचा तुटवडाही जाणवत आहे.
बांधकामाच्या खर्चात मोठी वाढ
घर बांधणीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे रिअल इस्टेट कंपनी कोलियर्सच्या अहवालात स्पष्ट केले आहे. बांधकामाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 67 टक्के खर्च हा वापरण्यायोग्य वस्तूंवर करण्यात येतो. तर 28 टक्के खर्च हा कामगारांवर केला जातो आणि इंधनाच्या किमतींचा खर्च 5 टक्के आहे.बांधकाम साहित्यात प्रत्येक गोष्ट महागडं झालेली आहे. गेल्या वर्षभरात बांधकामाचा खर्च 10 ते 12 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये निवासी मालमत्तेचा बांधकाम खर्च प्रति चौरस फूट 2060 रुपये होता, तो यंदा 2300 रुपये झाला आहे. यासोबतघ औद्योगिक बांधकामाचा खर्चही वाढला आहे.
इतर बातम्या