बँकेत पैसे ठेवून जास्त व्याज मिळवायचंय, मग ‘हा’ पर्याय उत्तम
RD Account | तुम्ही RD खात्यात अगदी 10 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरु करु शकता. पोस्ट ऑफिसमध्ये 10 रुपयांची RD काढण्याची सुविधा आहे. RD मध्ये तुम्ही अगदी सहा महिन्यांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी पैसे जमा करु शकता.
मुंबई: सध्या बँकेतील बचत खात्यांवरील व्याजदर निचांकी पातळीला पोहोचला आहे. अशावेळी अनेकजण रिकरिंग डिपॉझिट( RD) खात्यात गुंतवणूक करुन जास्त व्याज मिळवण्याचा प्रयत्न करतात. ज्या लोकांना महिन्याला नियमित उत्पन्न मिळत असेल त्यांच्यासाठी RD खात्यामधील गुंतवणूक चांगला पर्याय आहे. दर महिन्याला RD मध्ये एक ठराविक रक्कम जमा करायची असते. या रक्कमेवर 2.50 ते 8.50 टक्के इतका व्याजदर मिळू शकतो. एकूणच RD खात्यावर फिक्स डिपॉझिटप्रमाणेच व्याज दिले जाते पण प्रीमियम महिन्याला जमा करण्याची मुभा असते.
तुम्ही RD खात्यात अगदी 10 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरु करु शकता. पोस्ट ऑफिसमध्ये 10 रुपयांची RD काढण्याची सुविधा आहे. RD मध्ये तुम्ही अगदी सहा महिन्यांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी पैसे जमा करु शकता. यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. RD मध्ये गुंतवणूक केल्यानंतर मध्येच पैसे काढता येत नाहीत. तुम्ही वेळेआधी पैसे काढल्यास त्यावर दंड भरावा लागतो.
कोणत्या बँकेत RD वर सर्वाधिक व्याज
सध्याच्या घडीला इंडसइंड बँक RD खात्यावर सर्वाधिक व्याज देत आहे. सामान्य नागरिकांसाठी हा व्याजदर 7.25 ते 8 टक्के इतका आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 7.75 ते 8.50 टक्के इतका आहे. तर स्मॉल फायनान्स बँकांकडून RD वर 6.75-8.50 टक्के इतके व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 7.35-9.10 टक्के इतका आहे. तर बड्या बँकांमध्ये RD चा व्याजदर साधारण 5 ते 7 टक्क्यांच्या आसपास आहे.
‘या’ बँकेच्या RD खात्यात महिन्याला 5 हजारांची गुंतवणूक करा, 6 वर्षांनी मिळवा 4.26 लाख
ICICI बँकेने मोबाईल App च्या माध्यमातून RD खाते खोलण्याची सुविधा देऊ केली आहे. त्यासाठी तुम्हाला हे App स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल. हे अकाऊंट उघडल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यातून विशिष्ट रक्कम कापली जाईल आणि RD मध्ये जमा होईल.
ज्येष्ठ नागरिक आणि सामान्यांसाठी RD चा दर वेगवेगळा आहे. तुम्ही RD खात्यात महिन्याला 5000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करु शकता. समजा तुम्ही सहा वर्षापर्यंत गुंतवणूक केली आणि तुम्हाला 5.5 टक्के व्याज मिळाले तर 2027 पर्यंत तुम्हाला साधारण 66,975 रुपये इतके व्याज मिळेल. याचा अर्थ महिन्याला फक्त 5 हजारांची गुंतवणूक करुन तुम्हाला सहा वर्षांनी 4,26,975 रुपये मिळतील.
संबंधित बातम्या:
SBI नंतर या बँकेचा मोठा निर्णय; ATM, चेकबुक आणि पैसे काढण्याच्या शुल्कात बदल
ग्रामीण भागात कमाईची सुवर्णसंधी; ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन कमवा पैसे
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; LTC Claim संदर्भात मोठा निर्णय