AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : जीएसटीचे नेमके प्रकार किती? SGST, CGST, IGST… यात नेमका फरक काय?

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लागू करण्यात येणार अप्रत्यक्ष कर आहे. केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी GST लागू करण्याची घोषणा केली होती.

Explainer : जीएसटीचे नेमके प्रकार किती? SGST, CGST, IGST... यात नेमका फरक काय?
GST
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 8:22 AM

मुंबई : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लागू करण्यात येणार अप्रत्यक्ष कर आहे. केंद्र सरकारने चार वर्षांपूर्वी GST लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अप्रत्यक्ष कराशी संबंधित ही सर्वात मोठी सुधारणा असल्याचे बोललं जात होते. जीएसटीचा उद्देश देशभरातील करांच्या दरातील असमानता दूर करणे हा होता. जगातील अनेक देशांमध्ये यापूर्वीच जीएसटी प्रणाली लागू केली गेली आहे. यामध्ये केंद्र व राज्यांचे अनेक कर विलीन केले गेले आहेत. (How Many Types Of GST In India What Are Difference)

जीएसटी लागू झाल्यानंतर संपूर्ण कर प्रणाली ही ऑनलाईन झाली आहे. जीएसटी नोंदणीपासून ते रिटर्न फाईलिंगपर्यंत काम ऑनलाईन केले जात आहे. याचा फायदा व्यावसायिकांनाही झाला आहे. यापूर्वी त्यांना वेगवेगळ्या करासाठी स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागत असे. मात्र आता त्यांना फक्त जीएसटीसाठी नोंदणी करावी लागेल.

जीएसटीचे चार प्रकार आहेत. यामध्ये इंटिग्रेटेड वस्तू आणि सेवा कर (IGST), राज्य वस्तू व सेवा कर (SGST), केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू व सेवा कर (UTGST) यांचा समावेश आहे. यातील काही कर हा राज्य सरकारला तर काही कर हा केंद्र सरकारकडे जातो. तसेच केंद्रशासित प्रदेशांनाही जीएसटी मिळतो.

?जीएसटीचे नेमके प्रकार किती?

आयजीएसटी (IGST)

जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पुरविली जाते तेव्हा आयजीएसटी (IGST) लागू होतो. एखाद्या वस्तू किंवा सेवांची विक्री, हस्तांतरण, विनिमय यांसह इत्यादींचा पुरवठा या अंतर्गत केला जातो. बर्‍याच वेळा व्यापारी एकाच राज्यात व्यवसाय करतात. पण त्यासाठी लागणारा माल हा इतर राज्यातून खरेदी केला जातो. अशा परिस्थितीत त्याला दुसर्‍या राज्यात खरेदी केलेल्या वस्तूंवर आयजीएसटी द्यावा लागतो.

एसजीएसटी (SGST)

जेव्हा कोणतीही वस्तू किंवा सेवा एकाच राज्यात पुरवली जाते, तेव्हा त्यावर एसजीएसटी (SGST) आकारला जातो. हा कर राज्याला मिळतो. जीएसटी कायद्यांतर्गत हा कर राज्यातील सर्व वस्तूंच्या किंवा सेवांच्या खरेदी आणि विक्रीवर आकारला जातो. मात्र, यातून काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे. एसजीएसटी लागू झाल्यानंतर राज्य सरकारकडून आकारण्यात येणारा व्हॅट (VAT), लक्झरी टॅक्स (Luxury Tax), करमणूक कर इत्यादी आकारल्या जाणाऱ्या इतर करांचे अस्तित्व बंद झाले.

सीजीएसटी (CGST)

एका राज्यात खरेदी केल्यानंतर त्याच राज्यात विकल्या जाणार्‍या वस्तू किंवा सेवांवर सीजीएसटी आकारला जातो. जेव्हा एखादा दुकानदार तुमच्याकडून एसजीएसटी शुल्क आकारतो, त्याच वेळी तो तुम्हाला सीजीएसटी देखील आकारतो. आता प्रत्येक वस्तू ही निर्धारित केलेल्या कर दराखाली येते. म्हणजे समजा एखाद्या वस्तूवरील कराचा दर हा 28 टक्के आहे. तर त्यातील 14 टक्के कर हा एसजीएसटी आणि उर्वरित 14 टक्के कर हा सीजीएसटी म्हणून आकारला जातो. हा कर केंद्र सरकारकडे जातो.

यूटीजीएसटी (UTGST)

हा कर एसजीएसटीप्रमाणेच असतो. यातील मुख्य फरक म्हणजे हा कर वसूल करण्याचा अधिकार केवळ केंद्रशासित प्रदेशांना आहे. म्हणजेच ज्याप्रकारे राज्य सरकार एसजीएसटी गोळा करते. तसेच केंद्रशासित प्रदेश यूटीजीएसटी (UTGST) गोळा करतात.

(How Many Types Of GST In India What Are Difference)

संबंधित बातम्या : 

PHOTO | कमी पैशात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करताय? मग ‘हे’ पर्याय नक्की निवडा

आता फोनद्वारे अवघ्या दहा मिनिटात उघडा SBI बँकेत अकाऊंट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Income Tax Rules | मुलांच्या नावे भविष्यकालीन गुंतवणूक, कर सवलत मिळणार का? नियम काय?

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...