AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता ‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Google Pay | गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम वॉलेटकडून (PayTm) ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही 'गुगल पे'वरुन या सोन्याची विक्रीही करू शकता.

आता 'गुगल पे' वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
डिजिटल गोल्ड
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 7:52 AM

मुंबई: सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम वॉलेटकडून (PayTm) ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या दोन्ही पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही ‘गुगल पे’वरुन या सोन्याची विक्रीही करू शकता.

‘गुगल पे’ वरुन सोनं कसं खरेदी कराल?

* सर्वप्रथम गुगल पे अॅप सुरु करा. * स्क्रीनच्या खालच्या बाजूला असणाऱ्या New Payment ऑप्शनवर क्लिक करा. * त्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला गोल्ड लॉकर हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. * Buy बटणावर क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनवर सोन्याचे दर दिसू लागलीत. यामध्ये टॅक्सचाही समावेश असेल. * तुम्ही सोने खरेदी करताना स्क्रीनवरील किंमत 5 मिनिटांसाठी लॉक होईल. * तुम्ही किती सोने खरेदी करायचे आहे, याचा तपशील स्क्रीनवर भरावा. * त्यानंतर चेक मार्कवर क्लिक करावे. * प्रोसिड बटनवर क्लिक करून व्यवहार पूर्ण करावा. * व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये सोनं जमा झालेलं दिसेल.

किती सोनं खरेदी करु शकता?

‘गुगल पे’च्या माध्यमातून तुम्ही एका दिवसात 50000 रुपयांचे सोने खरेदी करु शकता. तुम्हाला किमान 1 ग्रॅम सोनं खरेदी करावे लागेल. सोनं खरेदी करण्यासाठी केवायसीच्या नियमांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

सोनं कसं विकाल?

* सर्वप्रथम गुगल पे अॅप सुरु करा. * स्क्रीनच्या खालच्या बाजूला असणाऱ्या New Payment ऑप्शनवर क्लिक करा. * सर्च बारमध्ये गोल्ड लॉकर दिसेल. * Sell बटणावर क्लिक करा, तुम्हाला बाजारभाव दिसायला लागतील * तुम्हाला हव्या असलेल्या बाजारभावानुसार सोनं विकायची प्रक्रिया सुरु केल्यानंतर स्क्रीनवरील किंमत 8 मिनिटांसाठी फ्रीज होईल. * किती सोनं विकायचं आहे, ते स्क्रीनवर मेन्शन करा. त्यानुसार तुम्हाला मिळणारे पैसे दिसतील. * चेक मार्कवर क्लिक करा. * व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सोन्याची विक्री करुन मिळालेले पैसे स्क्रीनवर दिसतील.

गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार

बँका आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्थांप्रमाणे आता गुगलनेही मुदत ठेव योजना (Fixed Deposite Scheme) सुरु केली आहे. केवळ भारतातील ग्राहकांसाठी गुगलने ही योजना सुरु केली आहे. त्यानुसार ग्राहक Google Pay च्या माध्यमातून FD खरेदी करु शकतील. सेतू या फिनटेक कंपनीच्या साहाय्याने गुगलने ही योजना सुरु केली आहे.

या कंपनीच्या एपीआयच्या माध्यमातून गुगल ग्राहकांना मुदत ठेवीची सेवा देईल. मात्र, गुगल स्वत: ही स्कीम विकणार नाही. तर अन्य बँकांच्या एफडी ‘गुगल पे’च्या माध्यमातून थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देईल. यामध्ये सुरुवातीला इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेची मुदत ठेव योजना ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेच्या एका वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 6.35 टक्के इतके व्याज मिळेल. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. त्यासाठी सेतू कंपनीने एपीआयचे बीटा व्हर्जन तयार केले आहे. त्यामुळे आता लवकरच ही योजना ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री.
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला.
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?.