AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही

कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसदाराकडून संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्र रद्द करण्यासाठी प्रक्रिया करणे अपेक्षित असते. जेणेकरून भविष्यात कोणीही त्याचा गैरवापर करणार नाही.

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 3:50 PM

मुंबई: मोबाईलचे सीम खरेदी करण्यापासून ते बँक व्यवहारापर्यंतच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड (Pan Card) आणि मतदार ओळखपत्र (Voting Card) ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात. या तीन गोष्टींअभावी तुमची अनेक कामे रखडू शकतात. मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या दस्तावेजांचे काय होते, असा प्रश्न अनेकांना पडत असेल. (Know what happened to aadhar card pan card and voting id after persons death)

कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसदाराकडून संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्र रद्द करण्यासाठी प्रक्रिया करणे अपेक्षित असते. जेणेकरून भविष्यात कोणीही त्याचा गैरवापर करणार नाही.

मतदार ओळखपत्र कसे रद्द करायचे?

व्होटिंग कार्ड हे मतदानासोबतच तुमचे ओळखपत्र म्हणून वापरता येते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना निवडणूक कार्यालयात जाऊन 7 नंबरचा फॉर्म भरावा लागतो. त्यावेळी मृत्यूचा दाखला सादर करावा लागतो. त्यानंतर संबंधित व्यक्तीचे मतदार ओळखपत्र रद्द होते.

पॅनकार्ड रद्द करण्यासाठी काय कराल?

पॅनकार्ड हे व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आयकर विभागाकडे पॅनकार्ड सरेंडर करणे गरजेचे असते. पॅनकार्ड सरेंडर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची सर्व बँक खाती बंद केली आहेत किंवा नाही, याची खातरजमा करुन घ्यावी.

आधारकार्ड रद्द कसे कराल?

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डाचा गैरवापर टाळण्यासाठी ते तातडीने रद्द करणे गरजेचे असते. आधार कार्ड रद्द करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया नसते. त्यामुळे एखादा व्यक्ती मृत झाल्याची माहिती डेटाबेसमध्ये नोंदवली जाऊ शकत नाही. त्यामुळे मृत व्यक्तीला कोणतेही सरकारी लाभ मिळत असतील तर संबंधित विभागाशी संपर्क साधून ते लाभ थांबवण्याची गरज असते.

इतर बातम्या:

Business Idea | 10 हजारांची गुंतवणूक, दरमहिना 30 हजारांची कमाई, घरबसल्या सुरु करा ‘हा’ बिझनेस

मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा नवा व्यवसाय, 80 टक्क्यांपर्यंत कर्ज, 6 लाखांचा निव्वळ नफा

PHOTO | तुमच्याकडे असलेले सोनं खरं की खोटं? आता घरबसल्या करा शुद्धतेची तपासणी

(Know what happened to aadhar card pan card and voting id after persons death)

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.