फाटलेली नोट बँकेतून कशी बदलून घ्याल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How to replace torn notes from banks | रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, अर्धवट फाटलेल्या नोटेचेही मूल्य असते. आता प्रत्येक नोटेसाठी हा नियम वेगवेगळा आहे. मात्र, तरीही 500 किंवा 2000 रुपयांच्या फाटलेल्या नोटेची तुम्हाला बऱ्यापैकी नुकसानभरपाई मिळू शकते.

फाटलेली नोट बँकेतून कशी बदलून घ्याल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 7:49 AM

नवी दिल्ली: बऱ्याचदा आपल्याकडे असणाऱ्या नोटा भिजतात, खराब होतात किंवा फाटतात. त्यामुळे अनेकांना पैसे गमावल्याची खंत सतावत राहते. मात्र, आता तुमच्याकडील नोट फाटल्यास नाराज होण्याचे कारण नाही. तुम्ही बँकेत जाऊन सहजपणे या नोटा बदलून घेऊ शकता. जीर्ण झालेल्या आणि फाटलेल्या नोटांच्या मोबदल्यात बँक तुम्हाला कोऱ्या करकरीत नोटा देईल. मात्र, यासाठी काही अटीशर्ती लागू असतील.

फाटलेल्या नोटच्या भागानुसार बँक तुम्हाला पैसे परत करेल. कधीकधी नोटा चुकून फाटतात. त्याच वेळी, बहुतेक जुन्या नोटा आणि भरतकाम केलेल्या नोटा बाहेर काढताना फाटल्या जातात. जर तुमच्याकडे देखील अशा नोटा असतील, तर जाणून घ्या तुम्ही त्यांना बँकेतून कसे बदलू शकता.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, अर्धवट फाटलेल्या नोटेचेही मूल्य असते. आता प्रत्येक नोटेसाठी हा नियम वेगवेगळा आहे. मात्र, तरीही 500 किंवा 2000 रुपयांच्या फाटलेल्या नोटेची तुम्हाला बऱ्यापैकी नुकसानभरपाई मिळू शकते.

रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर नमूद केलेल्या माहितीनुसार, 1 ते 20 रुपये मूल्याची नोट अर्धवट फाटली असेल तर त्याचे अर्धे मूल्य मिळू शकत नाही. अशा स्थितीत या नोटांचे पूर्ण मूल्य दिले जाते. पण 50 रुपये ते 2000 रुपयांच्या नोटा फाटल्या असतील तर तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळू शकते.

काय आहेत फाटलेल्या नोटांचे पैसे मिळवण्याचे नियम?

एका रुपयाची नोट ही 61.11 सेंटीमीटर स्क्वेअर इतक्या आकाराची असते. या नोटेचा 31 सेंटीमीटर स्क्वेअर भाग असल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.

2 रुपयांची नोट 67.41 सेंटीमीटर स्क्वेअर इतक्या आकाराची असते. या नोटेचा 34 सेटींमीटर हिस्सा तुमच्याकडे असल्यास पूर्ण पैसे मिळतात.

5 रुपयांची नोट 73.71 सेंटीमीटर स्क्वेअर इतक्या आकाराची असते. या नोटेचा 37 सेंटीमीटरचा हिस्ला असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात.

10 रुपयांची नोट 86.31 सेंटीमीटर स्क्वेअर इतक्या आकाराची असते. या नोटेचा 44 सेटींमीटर हिस्ला असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात.

20 रुपयांची नोट 92.61 सेंटीमीटर स्क्वेअर इतक्या आकाराची असते. या नोटेचा 47 सेंटीमीटर हिस्सा असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात.

50 ते 2000 रूपये मूल्याच्या फाटलेल्या नोटांचे पैसे कसे मिळतात?

50 रुपयांच्या नव्या आणि जुन्या नोटांबाबत वेगवेगळे नियम आहेत. तुमच्याकडे जुन्या नोटेचा 43 सेंटीमीटर आणि नव्या नोटेचा 36 सेंटीमीटर हिस्सा असेल तर तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळते.

100 रुपयांच्या नव्या आणि जुन्या नोटांबाबत वेगवेगळे नियम आहेत. . तुमच्याकडे जुन्या नोटेचा 46 सेंटीमीटर आणि नव्या नोटेचा 75 सेंटीमीटर हिस्सा असेल तर तुम्हाला अर्धी रक्कम परत मिळते.

200 रुपयांच्या नोटेचा 78 स्क्वेअर मीटर भाग असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात. तर 39 सेंटीमीटर भाग असल्यास अर्धेच पैसे मिळतात.

500 रुपयांच्या नोटेचा 80 सेंटीमीटर भाग असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. पण तुमच्याकडे केवळ 40 सेंटीमीटरचा हिस्सा असेल तर अर्धेच पैसे परत मिळतील.

2000 रुपयांच्या नोटेचा 88 सेंटीमीटर असल्यास तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. तर 44 सेंटीमीटर हिस्सा असल्यास तुम्हाला अर्धेच पैसे मिळतील.

(RBI rules for torn notes)

ATM मधून फाटलेली नोट बाहेर आली तर काय कराल?

ATM मधून रंग लागलेली नोट बाहेर आली तर काय करावे? नियम काय सांगतो?

2000 रुपयांच्या फाटक्या नोटांच्या बदल्यात इतके पैसे मिळणार, पण नोट कुठे आणि कशी बदलायची?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.