SBI च्या कामचुकार कर्मचाऱ्यांची तक्रार कशी कराल; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SBI branch | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता बँकेचे ग्राहक कोणत्याही कर्मचाऱ्याने योग्य वागणूक किंवा सहकार्य न केल्यास एसबीआयच्या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात.

SBI च्या कामचुकार कर्मचाऱ्यांची तक्रार कशी कराल; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
स्टेट बँक ऑफ इंडिया
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 10:53 AM

मुंबई: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखांमध्ये अनेकदा योग्यप्रकारे काम सुरु नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ग्राहक अनेकदा याबाबत तक्रारीही करतात. मात्र, या सगळ्यावर चर्चा आणि थट्टेपलीकडे फारसे काही घडत नाही. (How to file online complaint of SBI employee or branch manager)

मात्र, SBI बँकेने आपल्या कामुचकार कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता बँकेचे ग्राहक कोणत्याही कर्मचाऱ्याने योग्य वागणूक किंवा सहकार्य न केल्यास एसबीआयच्या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात.

कर्मचाऱ्याची तक्रार कशी कराल?

बँकेच्या कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी https://cms.onlinesbi.com/CMS याठिकाणी जाऊन तक्रार नोंदवता येईल. संकेतस्थळावर गेल्यानंतर General Banking पर्याय क्लिक करावा, त्यानंतर Branch Related पर्याय निवडावा. त्यामध्ये तुम्ही आपली तक्रार नमूद करु शकता. आता या तक्रारींची बँकेकडून कितपत दखल घेतली जाणार, हेदेखील पाहावे लागेल.

SBI बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट; दोन तास ‘ही’ सेवा बंद राहणार

स्टेट बँक इंडियाकडून (SBI) ग्राहकांसाठी एक महत्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी एसबीआयच्या इंटरनेट बँकिंगसह डिजिटल सेवा दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येतील. ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी बँकेकडून सिस्टीम अपग्रेडेशन सुरु आहे. त्यासाठी उद्या दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत इंटरनेट बँकिंगची सुविधा बंद राहील. त्यामुळे SBIच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंगच्य माध्यमातून महत्वाचे व्यवहार करायचे असल्यास ती कामे आजच आटपून घेणे गरजेचे आहे. सिस्टीम अपग्रेडशनच्या काळात इंटरनेट बँकिंग, योनो अ‍ॅप (YONO App), योनो लाइट (YONO Lite) आणि यूपीआय (UPI) लाईट या सर्व सुविधा बंद असतील.

संबंधित बातम्या:

SBI चा ग्राहकांना मोठा दिलासा, घरबसल्या वारसदाराची नोंदणी करण्याची सुविधा सुरु

SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण, लाभ घेण्यासाठी काय करायचं?

HDFC बँकेच्या शेअर होल्डर्ससाठी महत्वाची बातमी; 18 जूनला मोठया घोषणेची शक्यता

(How to file online complaint of SBI employee or branch manager)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.