AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ayushman card: आयुष्मान कार्ड कसे बनवणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ayushman Bharat Yojana: केंद्र सरकारने म्हटले आहे की, जर कुटुंबातील कोणताही सदस्य आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या कुटुंबात एक वृद्ध व्यक्ती असेल तर आता त्या वृद्ध व्यक्तीचे नवीन कार्ड वेगळे केले जाईल. त्यासाठी नोंदणीही नव्याने करावी लागणार आहे.

ayushman card: आयुष्मान कार्ड कसे बनवणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
ayushman card
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 4:41 PM

ayushman card: केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली आहे. आता देशातील 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले कोणीही आयुष्मान कार्ड बनवू शकणार आहे. त्यासाठी उत्पन्नाची अट नाही. आयुष्यमान कार्डमध्ये पाच लाखांपर्यंतचा विमा दिला जात आहे. कोणत्याही रुग्णालयात पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहे.

34.7 कोटी लोकांना आयुष्मान कार्ड

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी वृद्धांना कोणत्याही कार्यालयात जावे लागणार नाही. फक्त त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे. ही कागदपत्रे असताना मोबाईल ॲपद्वारेच कार्ड बनवले जाणार आहे. याबाबतचा आदेशही सरकार आठवडाभरात काढणार आहे. वृद्ध लोकांनी हे आयुष्यमान कार्ड बनवल्यानंतर त्यांना अनेक गंभीर आजारांवर रुग्णालयात मोफत उपचार करता येणार आहेत. 30 जून 2024 पर्यंत देशातील 34.7 कोटी लोकांना आयुष्मान कार्ड मिळाले आहे.

अशा व्यक्तीसाठी नवीन कार्ड

केंद्र सरकारने म्हटले आहे की, जर कुटुंबातील कोणताही सदस्य आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेत असेल आणि त्या कुटुंबात एक वृद्ध व्यक्ती असेल तर आता त्या वृद्ध व्यक्तीचे नवीन कार्ड वेगळे केले जाईल. त्यासाठी नोंदणीही नव्याने करावी लागणार आहे. कार्ड बनवल्यानंतर वृद्धांना कोणत्याही रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

या लोकांनाही असणार पर्याय

केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ घेणारे 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृद्ध देखील आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड बनवण्याचा पर्याय निवडू शकतात, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. जर एखाद्याचे वय 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि त्याचा खाजगी आरोग्य विमा असेल तर तो या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतो.

टोल फ्री क्रमांक 14555 वर करता येणार कॉल

आयुष्मान कार्डशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 14555 वर कॉल करू शकता. हे कार्ड बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. कोणत्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे त्याची सर्व माहिती मिळेल. सध्या दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आयुष्मान योजना नाही. या राज्य सरकारांनी ही योजना लागू केलेली नाही.

ऑनलाइन आयुष्मान असे काढा?

  • गुगल प्ले स्टोअरवरून ‘आयुष्मान’ ॲप डाउनलोड करा.
  • ॲप डाउनलोड मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
  • तुमची पात्रता तपासा.
  • पात्र असाल तर आधार ई-केवायसी करा.
  • फोटो अपलोड करा आणि कार्ड डाउनलोड करा

ही प्रक्रिया वेबसाईटवरसुद्धा करता येते.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....