AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचं आधार कार्ड बनावट आहे का? एका मिनिटात तपासून पाहा

Aadhaar Card | भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीकडून (UIDAI) यासंदर्भात काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आधार कार्डाची पडताळणी करु शकता.

तुमचं आधार कार्ड बनावट आहे का? एका मिनिटात तपासून पाहा
तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल सिमबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्हाला आधी https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकून तुम्हाला आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकांची माहिती मिळेल.
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 6:35 AM

मुंबई: सध्याच्या काळात अगदी सीमकार्ड, रेशनकार्डपासून ते जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आधारकार्ड ही अनिवार्य गोष्ट आहे. त्यामुळे आधार कार्डाच्याबाबतीत (Aadhaar Card) कोणताही गैरप्रकार होणे परवडणारे नसते. अनेकदा लोकांना आपले आधारकार्ड बनावट आहे, हेदेखील माहिती नसते. एखाद्या कामासाठी आधार कार्डाचा वापर करायला गेल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात येते. त्यामुळे या लोकांची ऐनवेळी फसगत होते. हा प्रकार टाळण्यासाठी तुम्ही स्वत:चे आधार कार्ड खरे किंवा खोटे आहे, हे तपासून पाहू शकता.

भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीकडून (UIDAI) यासंदर्भात काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आधार कार्डाची पडताळणी करु शकता. ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी QR कोड स्कॅन करावा लागेल. तर ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी resident.uidai.gov.in/verify या लिंकवर क्लिक करावे लागेल. याठिकाणी जाऊन तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकून आधारच्या अस्सलपणाची खात्री करता येईल.

आधार कार्डाची पडताळणी कशी कराल?

* सर्वप्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉगिन करा. * पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. * त्यानंतर कॅप्चा कोड टाका. * यानंतर व्हेरिफाई बटणावर क्लिक करा. * तुमचा आधार क्रमांक योग्य असल्याचा एक मेसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्या. * याशिवाय, तुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल.

मास्क्ड आधारकार्ड म्हणजे काय?

eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर लॉगइन करुन तुम्ही नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करु शकता. मास्क्ड आधार कार्डावर केवळ शेवटचे चार क्रमांक दिसतात. तुम्ही हव्या त्या प्रकारे आधारकार्ड डाऊनलोड करु शकता.

इतर बातम्या : 

महागाईचा भडका, इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती गगनाला, दर काय?

लाखभर पगार असूनही बचत शून्य, जाणून घ्या गुंतवणूकीच्या सोप्या टिप्स

मॅनेजमेंट बदलताच ‘या’ कंपनीचे शेअर होल्डर्स मालामाल, एका शेअरची किंमत 100 रुपयांहून कमी

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.