AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF अकाऊंटमधून पैसे काढायचे आहेत? मग हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे

पीएफ अकाऊंटमधून पैसे काढायचे असतील तर सर्वांनाच पीएफचे काही नियम माहिती करून घेणं आवश्यक आहे.

PF अकाऊंटमधून पैसे काढायचे आहेत? मग हे नियम तुम्हाला माहित असायलाच हवे
भविष्य निर्वाह निधी
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 7:22 PM

सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कार्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला एक विशिष्ठ रक्कम PF म्हणून कपात होते. पगारातून कापली जाणारी ही रक्कम म्हणजे नोकरदारांसाठी बचत आणि गुंतवणूक असे दोन्ही फायदा देणारी ठरते. पीएफचं वैशिष्ठ्य म्हणजे यातून ग्राहकांना चांगला रिटर्न्स तर मिळतोच शिवाय पीएफ अकाऊंटमधून हे पैसे कधीही काढले जाऊ शकतात. पण पीएफचे असे अनेक नियम आहेत ज्यांची सर्वांनाच कल्पना नाही. त्यामुळे अनेकदा गरज असतानाही पैसे काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. (how to withdraw epf amount and pension fund)

पीएफ अकाऊंटमधून पैसे काढायचे असतील तर सर्वांनाच पीएफचे काही नियम माहिती करून घेणं आवश्यक आहे. तरच तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकाल. अन्यथा पैसे काढताना तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल.

जर तुम्ही खासगी नोकरी करत असाल तर साधारणपणे काही वर्षांनी नोकरी बदलली जाते. त्यामुळे एका यूएएननंबर अंतर्गत अनेक अकाऊंट बनत जातात. या सर्व अकाऊंटना एकत्रित करणं आवश्यक असतं. असं केलं नाही तर तुमचे पैसे वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये छोट्या-छोट्या रकमेत जमा होतात. हे सर्व अकाऊंट्स जर एकत्रित केले तर तुमचे सर्व पैसे एकाच अकाऊंटमध्ये जमा होतात आणि तुम्ही एकरकमी सर्व पैसे काढू शकता आणि त्यासाठी कसलीही अडचण येत नाही.

नियम काय सांगतो?

परंतू ज्यावेळी तुम्ही एका अकाऊंटमधून दुसऱ्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करत असता त्यावेळी संपूर्ण रक्कम ट्रान्सफर होत नाही. यामध्ये केवळ ईपीएफची रक्कम ट्रान्सफर होते. पेन्शन फंडची रक्कम ट्रान्सफर होत नाही. ईपीएफनेही याबाबत ट्विट करत अधिकृत माहिती दिली आहे. ‘एका अकाऊंटमधून दुसऱ्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करत असताना त्यात कर्मचारी आणि कंपनीची पीएफ रक्कम ट्रन्सफर केली जाते. पेन्शनची रक्कम कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत अकाऊंटमध्येच ठेवली जाते’, असं ट्विट ईपीएफओने केलं आहे.

पेन्शन फंड कसा काढता येईल?

पीएफ अकाऊंटमध्ये दोन प्रकारचा फंड जमा होतो. एक म्हणजे ईपीएफ आणि दुसरा पेन्शन फंड. यापैकी पीएफचे पैसे वेगवेगळ्या कारणांसाठी काढले जाऊ शकतात. यामध्ये मेडिकल, शिक्षण, लग्न, घर बांधकाम अशा कारणांसाठी पीएफची रक्कम काढण्याची मुभा आहे. मात्र, पेन्शन फंड काही निवडक कारणं सोडली तर सेवानिवृत्तीपर्यंत काढला जाऊ शकत नाही. तरीही तुम्हाला पेन्शन फंड काढायचा असेल तर त्यासाठी नियम आहे. पेन्शन फंड काढण्यासाठी अकाऊंट उघडून किमान 6 महिने झालेलं असणं गरजेचं आहे. 6 महिन्यांनंतरच तुम्ही पेन्शन फंड काढण्यासाठी मागणी करू शकता. याशिवाय पेन्शन फंड काढण्यासाठी 10 वर्षांची मर्यादा आहे. (how to withdraw epf amount and pension fund)

म्हणजे, नोकरी करत असताना तुम्हाला 10 वर्ष होत आहेत तर तुम्ही 10 वर्ष होईपर्यंतच पेन्शन फंडचे पैसे काढू शकता. 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन सर्टिफिकेट जारी केलं जातं. त्यानंतर वेगळे नियम लागू होतात.

बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.