आता महागाईने महिन्याचे बजेट कोलमडणार; ‘HUL’ च्या साबण आणि चहाच्या किंमतीने आता तोंड पोळणार
या काळात दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या उत्पादनांच्या किंमतीविषयी बोलताना कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कच्चा मालाच्या किंमतीमध्ये फरक पडला असल्याने मुख्य उत्पादनांमध्ये वाढ झाली आहे.
मुंबईः सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका आता बसणार आहे. FMCG क्षेत्रातील दिग्गज HUL (Hindustan Unilever Limited) कंपनीने पुन्हा एकदा आपल्या डिटर्जंट आणि साबणांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. ही वाढ कमाल १७ टक्क्यांपर्यंत असणार आहे. कंपनीने गेल्या 5 महिन्यांत 4 वेळा उत्पादनांच्या (Product) किंमती (Prices) वाढवल्या आहेत. या काळात दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या उत्पादनांच्या किंमतीविषयी बोलताना कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कच्चा मालाच्या किंमतीमध्ये फरक पडला असल्याने मुख्य उत्पादनांमध्ये वाढ झाली आहे.
तरीही किंमतीविषयी स्पष्टीकरण देताना एचयूएलच्या म्हणण्यानुसार, कच्च्या मालाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे झालेल्या या वाढीमुळे उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
चहा-कॉफीच्या किंमतीत वाढ
डिटर्जंट आणि साबणांच्या किंमतीत वाढ करत असतानाच या आठवड्यात कंपनीकडून चहा आणि कॉफीच्या किंमतीत 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीही वाढ केली आहे. वाढत्या किंमतीमुळे ही शेवटची वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
मॅगीही महाग झाली
किंमत वाढीवर स्पष्टीकरण देताना कंपनीकडून कच्चा मालाच्या किंमतीचा संदर्भ देण्यात येत असला तरी HUL कंपनीकडून या आठवड्यात कंपनीने आपल्या अनेक उत्पादनांच्या किंमती वाढवल्या आहेत. 14 मार्चपासून ब्रू कॉफीच्या किंमतीत 3 ते 7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर त्याचबरोबर ब्रू गोल्ड कॉफीच्या जारच्या किंमतीमध्ये 3 ते 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्या आहेत. यासोबतच इन्स्टंट कॉफी पाऊचच्या किंमतीतही ७ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर ताजमहाल चहाची किंमत ३.७ टक्क्यांवरून ५.८ टक्के करण्यात आली आहे.
कच्चा मालाच्या किंमतीत वाढ
या सर्व प्रकारच्या ब्रुक बाँड चहाच्या किमती 1.5 टक्क्यांवरून 14 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. किंमतींच्या घोषणेनंतर एचयूएलने सांगितले होते की, वाढत्या खर्चामुळे किंमती वाढवण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे.
दूध पावडरसाठी एवढे पैसे लागणार
या पदार्थांच्या महागाईचा फटका सगळ्याना बसत असला असतानाच मॅगीचे जे खवय्ये आहेत त्यांनाही या महागाईचा झटका बसणार आहे. नेस्ले इंडियाने मॅगीच्या किंमतीत १६ टक्क्यांपर्यंत वाढ करुन ठेवली आहे. आता 70 ग्रॅम मॅगीसाठी लोकांना 12 ऐवजी 14 रुपये मोजावे लागणार आहेत. तर यासोबतच दूध पावडर आणि कॉफी पावडरसाठीही लोकांना जास्त पैसे मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित बातम्या
Pegasus 25 कोटीला खरेदीची ऑफर मिळालेली, ममता बॅनर्जींचा धक्कादायक गौप्यस्फोट
…अन् अचानक E-rickshaw चालायला लागली! लोक म्हणतायत, हा तर ‘Mister India’चा डिलीट केलेला सीन..!