UPI Payments | मोबाईलवरून पेमेंट करताय? मग या 5 गोष्टी जाणून घ्या

UPI Payments | युपीआय पेमेंट्सच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे अनेकांचे खाते रिकामे झाली आहेत. आज आपण या लेखाच्या माध्यमातून अशा 5 खास गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतःला अशा फसवणुकीच्या घटनांपासून वाचवू शकता.

UPI Payments | मोबाईलवरून पेमेंट करताय? मग या 5 गोष्टी जाणून घ्या
असा सावध Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 1:19 PM

UPI Payments News | युपीआय (UPI) पेमेंट्सच्या मदतीने भारतासह जगात डिजिटल क्रांती झाली. पूर्वी आपण काही खरेदी करीत असताना आपल्याला खिशात रक्कम ठेवावी लागत होती. परंतु आता त्याची गरज नाही. केवळ एका मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपयांची खरेदी विनापैसे खिशात ठेवून करु शकतात. डिजिटल व्यवहाराला (Digital transactions) सध्या चांगली चालना मिळाली आहे. युपीआयच्या मदतीने एखादी व्यक्ती काही सेकंदात अगदी सहज पेमेंट करू शकते. यासाठी पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या खात्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. पण आज आपण अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या जाणून घेतल्यावर तुम्ही युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून (Fraud) स्वतःला वाचवू शकाल.

1. UPI पिन शेअर करू नका

UPI पेमेंट करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा चार किंवा सहा अंकी UPI पिन. कोणाशीही शेअर करू नका, हे महत्त्वाचे आहे. हा पिन वापरुन फसवणुककर्ता सेकंदात तुमचे खाते रिकामे करु शकतो. त्यामुळे तुमचा युपीआय पिन क्रमांक कोणाला ही शेअर तर करुच नका, पण जवळच्या व्यक्तीदेखत तो वापरुही नका. युपीआय वापरताना काळजी घ्या.

हे सुद्धा वाचा

2. फोनवर स्क्रीन लॉक ठेवा

जर तुम्ही UPI अॅप वापरत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की बहुतेक लोक ते अनेक वेळा पिन टाकताना तुमचा मोबाईल पाहतात मग यावर उपाय म्हणून तुमच्या फोनवर स्क्रीन लॉक ठेवणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून कोणीही त्याचा गैरवापर करू शकणार नाही.

3. व्यवहार करण्यापूर्वी UPI आयडी व्हेरिफाय करा

पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी UPI आयडी वापरला जातो. अशा वेळी, जेव्हाही तुम्हाला कोणाकडून पैसे मिळतात, तेव्हा तुमचा UPI आयडी एकदा क्रॉस चेक करणे महत्त्वाचे आहे.

4. एका अॅपमध्ये एकापेक्षा जास्त UPI वापरू नका

कोणत्याही अॅपमध्ये एकापेक्षा जास्त UIP खाते वापरू नका. युजर्स एका अॅपच्या मदतीने इतर अॅप्सवर देखील पैसे देऊ शकतात.

5. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. अनेक एसएमएसमध्ये कॅशबॅक आणि डिस्काउंटद्वारे UPI आयडी हॅक केला जाऊ शकतो, ज्यामुळे युजर्स समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या लिंकवर ऑफर्सचा भडीमार असतो. त्यातून तुमची वैयक्तिक आणि युपीआय पेमेंटसंबंधित माहिती संकलीत करुन तुम्हाला गंडा घालण्यात येतो.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.