EPFO PF Interest : पीएफचे व्याज झाले की नाही जमा, असे चेक करा पासबुक

EPFO PF Interest : पीएफवरील व्याजदरात केंद्राने यंदा वाढ केली. घसरणीला ब्रेक लावला. पीएफ खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरीत करणार आहे. तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे पासबुक आधारे असे तपासता येईल.

EPFO PF Interest : पीएफचे व्याज झाले की नाही जमा, असे चेक करा पासबुक
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 8:40 AM

नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : केंद्र सरकारने नुकताच देशभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफवरील व्याजदरात ( PF Interest) वाढीचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या दोन टर्ममध्ये व्याजदर घसरणीवरुन वेतनदारांमध्ये नाराजी होती. यंदा व्याजदराच्या घसरणीला ब्रेक लावण्यात आला. यावेळी व्याजदरात किंचित वाढ करण्यात आली. नोकरदारांच्या पीएफ खात्यात यंदा व्याजाची जादा रक्कम येईल. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी ईपीएफ खात्यावर 8.15 टक्के व्याजदर निश्चीत केले. केंद्राने पीएफ खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरीत करणार आहे. तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे पासबुक (Passbook) आधारे असे तपासता येईल.

6 कोटी सदस्यांना लाभ

सोमवारी 24 जुलै रोजी ईपीएफओने सर्व विभागीय कार्यालयांना मार्च 2023 पर्यंत 6 कोटींपेक्षा अधिक सक्रिय सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले. यापूर्वी 1977-78 मध्ये ईपीएफवर व्याजदर 8 टक्के होते. त्यानंतर 2021-22 केंद्र सरकारने सर्वात कमी 8.1 टक्के व्याजदर निश्चित केले होते. आता त्यात वाढ झाली असून व्याजदर 8.15 टक्क्यांवर पोहचले आहे.

हे सुद्धा वाचा

या तीन पद्धतीने तपासा बॅलन्स

अनेक सदस्यांना पासबुकमध्ये किती रक्कम शिल्लक आहे. किती रक्कम काढता येते. खात्यासंबंधीची अपडेट कशी तपासावी याची माहिती नसते. त्यांना या तीन पद्धतीने खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती घेता येईल.

उमंग ॲपद्वारे तपासा बॅलन्स

स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करा. त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा. येथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.

मिस्ड कॉलद्वारे PF मधील शिल्लक जाणून घ्या

तुम्हाला तुमच्या पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.

एसएमएसद्वारे जाणून घ्या रक्कम

पीएफ खात्यात सध्याच्या घडीला किती रक्कम आहे, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन माहिती करुन घेऊ शकता. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाइप करावे आणि मराठी MAR लिहावे. तुम्हाला हिंदीत माहिती मिळवण्यासाठी EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला शिल्लक माहिती सहज मिळेल.

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.