एटीएममधून फाटलेल्या नोटा मिळाल्या, तर त्या बदलून मिळतात का? काय आहेत नियम
पूर्वीप्रमाणे रोख व्यवहार राहिलेले नसले तरी अनेक ठिकाणी अजूनही रोख व्यवहार करायला रोकड लागते. त्यामुळे आपण एटीएममधूनच हवे तसे पैसे काढत असतो. परंतू काही वेळा एटीएममधून फाटलेल्या नोटा मिळण्याचा धोका असतो. जर तुम्हालाही फाटक्या नोटा मिळाल्या तर चिंता करण्याची काही गरज नाही, या नोटा बॅंकातून बदलून मिळतात.

मुंबई | 3 डिसेंबर 2023 : ऑनलाईन व्यवहार वाढल्याने जरी कॅशची अदान-प्रदान घटले असले तरीही अनेक ठिकाणी रोख व्यवहार अजूनही सुरु आहेत. दैनंदिन जीवनात अनेक कामासाठी कॅशची गरज लागत असते. एटीएमद्वारे आपण रोख रक्कम काढीत असतो. परंतू कधी-कधी एटीएममधून देखील फाटलेल्या नोटा मिळू शकतात. मग अशावेळी काय करायचं ? या नोटा बदलून मिळतात की नाही. जर मोठ्या ट्रांक्झक्शनमध्ये बऱ्याच नोटा फाटलेल्या मिळाल्या तर काय करायचे ? चला याबाबत रिझर्व्ह बॅंकेचे नियम काय आहेत ? आरबीआयच्या मतानूसार जर तुम्हाला एटीएममधून फाटलेल्या नोटा मिळाल्या तर आपण बॅंकेत जाऊन त्या बदलून घेऊ शकतो. आरबीआय म्हणते सरकारी किंवा खाजगी बॅंकांच्या शाखात कोणत्याही अडचणी शिवाय नोटा बदलता येतात. बॅंक जर नोटा बदलून देण्यास नकार देत असेल तर बॅंकेला दंड देखील होऊ शकतो.
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वे काय ?
एप्रिल 2017 मध्ये RBI ने आपल्या एका गाईडलाईनमध्ये म्हटले आहे की बॅंक तुटलेल्या किंवा फाटलेल्या नोटांना बदलण्यास मनाई करु शकत नाहीत. एटीएममधून काढलेल्या फाटक्या नोटांना त्याच बॅंकांत घेऊन जा ज्या बॅंकांच्या एटीएममधून त्या काढलेल्या आहेत. अर्ज लिहीताना पैसे काढल्याची तारीख आणि वेळ नोंदवा. तसेच ज्या एटीएममधून काढल्या त्याचा पत्ता लिहावा.
नंतर काय करावे ?
अर्जासोबत त्या एटीएमची निघालेली स्लीपची कॉपी देखील जोडावी. जर स्लीप निघाली नसली तर मोबाईलमध्ये आलेल्या ट्राक्झंक्शनची सविस्तर माहीती लिहावी. या डिटेल्ससोबत तुम्ही फाटलेल्या नोटांना सहज बदलू शकता. जर फाटलेल्या नोटांना बदलून देण्यास बॅंकेने नकार दिला तर त्या बॅंकेला दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो असे आरबीआयच्या परिपत्रकात म्हटले आहे.
या बाबीची काळजी घ्या
नियमानूसार एक व्यक्ती एका वेळी 20 नोट बदलू शकतो. या नोटांचे एकूण मुल्य 5000 हून अधिक नसावे. वाईट प्रकारे जळालेल्या, तुकडे तुकडे झालेल्या नोटांना बदलता येणार नाही. एटीएममधून फाटलेल्या अवस्थेत मिळल्या नोटाच केवळ बदलून मिळतील असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.
