नव्या वर्षात जीएसटीमध्ये वाढ; ‘या’ वस्तू महागणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ

नव्या वर्षात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये अनेक वस्तू आणि सेवांवरील जीएसटीमध्ये वाढ होणार आहे. जीएसटी वाढल्याने वस्तूंचे दर देखील आपोआप वाढतील.

नव्या वर्षात जीएसटीमध्ये वाढ; 'या' वस्तू महागणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ
जीएसटी
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 6:45 AM

नवी दिल्ली : नव्या वर्षात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये अनेक वस्तू आणि सेवांवरील जीएसटीमध्ये वाढ होणार आहे. जीएसटी वाढल्याने वस्तूंचे दर देखील आपोआप वाढतील. आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. त्यातच येणाऱ्या काळात खाद्यपदार्थ, कपडे आणि ऑनलाईन खरेदी महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कपडे महागणार

कपडे आणि चामड्यांच्या उत्पादनावरील जीएसटीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या कपड्यांवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येतो. मात्र आता तो वाढून बारा टक्के करण्यात येणार आहे. एक जानेवारी 2022 पासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. जीएसटी वाढल्यामुळे आपोआपच कपडे आणि चामड्याची उत्पादने जसे की चपला, पर्स पाकिटे इत्यादी महाग होतील.

ओला उबेरची प्रवासी सेवा

ओला उबेरची प्रवासी सेवा देखील येत्या एक जानेवारीपासून महागणार आहे. ओला उबेरच्या राईडसाठी तुम्हाला आता पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागू शकतात. मात्र इतर प्रवासी वाहनाचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

ऑनलाईन फूड डिलेव्हरी

स्विगी, झोमॅटो सारख्या ऑनलाईन फूड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्यांना देखील जीएसटीच्या कक्षेत आणले जाणार आहे. ऑनलाईन फूडवर देखील जीएसटी लावण्यात येणार असल्याने ऑनलाईन फूडसाठी ग्राहकांना आता अधिक पैसे माजोवे लागतील.

संबंधित बातम्या

KYC update | बँक खातेदारांचा जीव भांड्यात; रिझर्व्ह बँकेने KYC अद्ययावत करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली

2022 मध्ये निर्यातीला येणार अच्छे दिन; पुढील वर्षी 530 अब्ज डॉलरच्या उलाढालीची अपेक्षा

Dry Day List 2022: नव्या वर्षात कधी कधी दारुची दुकाने बंद राहणार? ही लिस्ट जपून ठेवा

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.