Post Schemes | पोस्टाच्या योजना ही Digital, अवघ्या काही सेकंदात विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन भविष्य करा सुरक्षित
पोस्ट खात्याच्या विविध योजनांची आपल्याला माहित आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक आजही सुरक्षित मानण्यात येते. आता तर कात टाकत टपाल खाते हायटेक झाले आहे. डिजिटल पेमेंट आणि ॲप’चा उपयोग करून तुम्ही या योजनेत सहज गुंतवणूक करु शकता.
पोस्ट खाते सर्व सामान्य नागरिकांसह ज्येष्ठांसाठी आर्थिक फायद्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबविते. पोस्ट खाते बचत योजना (Saving account), पोस्ट आवर्ती ठेव योजना (RD) सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यासह नऊ योजना पोस्ट खाते चालविते.
या सर्व योजना त्यांच्या श्रेणीत उत्तम आणि सुरक्षित आहेत. पोस्ट खात्याच्या योजनेचं वैशिष्ट्ये म्हणजे यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.पोस्ट खात्यातील योजनेत गुंतवणूक केलाला पैसा बुडत नाही. कारण सरकार याविषयीची हमी देते.
पोस्ट खात्यातील योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही थेट पोस्ट कचेरीत जाऊ शकता अथवा डिजिटल युगात पोस्टाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेच्या (IPPB) ॲप’चा तुम्ही उपयोग खाते उघडू शकता.आईपीपीबी आता ग्राहकांना पोस्ट खाते आवर्ती ठेव, सुकन्या समृद्धि योजना आणि पीपीएफ खात्यात डिजिटल व्यवहाराची सुविधा देते.
सर्वात अगोदर उघडा हे खाते
खातेदारांना माहिती असायला हवे की, पोस्ट खात्याच्या बचत योजनेत डिजिटल व्यवहार करण्यासाठी सर्वात अगोदर इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक बचत खाते (आईपीपीबी एसबी) उघडावे लागेल. या प्रक्रियेनंतर पोस्ट खात्यातील योजनेत ऑनलाईन डिजिटल व्यवहार करू शकता. 18 वर्षांचा व्यक्ती हे खाते उघडू शकतात. खाते सुरू ठेवण्यासाठी केवायसी (KYC) प्रक्रिया 12 महिन्यांत पूर्ण करावी लागते. या खात्यात 2 लाख रुपये पर्यंत जमा करु शकतात. या डिजिटल बचत खात्याला एका नियमित बचत खात्यात बदलू शकते. त्यावर त्रेमासिक आधारावर 2.50 टक्के वार्षिक व्याज मिळते.
ऑनलाईन अशी जमा करा रक्कम
- आईपीपीबी खाते उघडल्यानंतर तुम्ही घर बसल्या पोस्ट खात्याच्या पीपीएफ, सुकन्या समृद्धि योजना आणि रिकेरिंग डिपॉजिटमध्ये पैसे जमा करु शकता.
- सर्वात अगोदर आईपीपीबी मोबाइल बॅंकिंग ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडा आणि 4 आकडी एमपिन च्या माध्यमातून लॉन इन करा.
- त्यानंतर ‘डीओपी सर्विसेज’ हा पर्याय निवडा. ज्या योजनेत पैसा गुंतवणूक करायचा आहे, त्यावर क्लिक करा.
- आवर्ती ठेव योजना, सुकन्या समृद्धि योजना वा पीपीएफ क्रमांक आणि डीओपी कस्टमर आईडी टाका.
- आता रक्कम जमा करा आणि ‘पे’ पर्याय क्लिक करा. त्यानंतर ‘कन्फर्म’ बटणावर क्लिक करा.
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी क्रमांक ‘सबमिट’ करा.
पाहा व्हिडीओ –
कामाच्या बातम्या –
Smart Home Tips | वीज बिलानं खिशाला भुर्दंड; टिप्स वापरा, वीज बिल घटवा
‘या’ बँका देतात झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर अधिक व्याज, खाते उघडण्यापूर्वी यादी चेक करा
UPI पेमेंट करताना रहा सावधान, नाहीतर व्हाल कंगाल; सुरक्षीत पेमेंट हीच खात्यातील रकमेची हमी