Indian Railway: मान्सूनमध्ये अखंडित सेवा देण्यासाठी रेल्वेची तयारी, अतिवृष्टी, पूर परिस्थितीत वाहतूक सुरु ठेवण्यासाठी प्लॅन तयार

भारताच्या बऱ्यापैकी भागात मान्सून सक्रिय झाला आहे. मान्सूनचा पाऊस जोरात सुरु असतो तेव्हा बऱ्याच वेळा रेल्वे वाहतूक स्थगित करावी लागते.

Indian Railway: मान्सूनमध्ये अखंडित सेवा देण्यासाठी रेल्वेची तयारी, अतिवृष्टी, पूर परिस्थितीत वाहतूक सुरु ठेवण्यासाठी प्लॅन तयार
Indian Railway
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 5:17 PM

Indian Railway Plans for Monsoon नवी दिल्ली: भारताच्या बऱ्यापैकी भागात मान्सून सक्रिय झाला आहे. मान्सूनचा पाऊस जोरात सुरु असतो तेव्हा बऱ्याच वेळा रेल्वे वाहतूक स्थगित करावी लागते. सध्या महाराष्ट्रातील मुंबईशहरामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे लोकल सेवा स्थगित करण्यात आली होती. मान्सूनचा पाऊस मुसळधार होत असतो त्यावेळी रेल्वे रुळ पाण्याखाली जाऊन किंवा रेल्वे रुळाखालील पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक थांबावावी लागते. मात्र, यावेळी रेल्वेने मॉन्सून दरम्यान वाहतूक स्थगित होऊ नये म्हणून मास्टरप्लॅन केला आहे. पूर्व मध्ये रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांनी मान्सूनच्या दरम्यान रेल्वे वाहतुकीला येणाऱ्या अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून काम करण्यात आलं आहे. मात्र, रेल्वेकडून वाहतूक स्थगित करावी लागल्यास ती तात्काळ पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केली जातील, असं सांगण्यात आलं आहे.

15 ऑक्टोबरपर्यंत रेल्वे अ‌ॅलर्ट मोडवर

मान्सूनच्या काळात पूर्व मध्य रेल्वे 12 मे ते 15 ऑक्टोबरपर्यंत अ‌ॅलर्ट मोडवर असते. राजेशकुमार यांनी पावसाच्या काळात रेल्वे पूल आणि रेल्वे रुळांच्या जवळपास पाणी साठणार नाही यासाठी योग्य प्रयत्न केले गेले आहेत. अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सातत्यानं पाहणी केली जातं आहे. रेल्वेने 4 पातळ्यांवर पावसाळ्यात वाहतूक स्थगित होऊ नये म्हणून प्रयत्न केले आहेत.

1.पुरांचा सामना करण्याची तयारी

मान्सून पावसाच्या काळात येणाऱ्या पुरांपासून वाचण्यासाठी पूर्व मध्य रेल्वेनं निवडक रेल्वे स्थानकांवर बोल्डर, स्टोन डस्ट, सिमेंटची रिकामी पोती याची व्यवस्था कऱण्यात आली आहे. रेल्वे रुळ आणि स्थानकांवरील पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली आहे. रेल्वे पुलांवर पाण्याच्या धोकादायक पातळीचं मार्किंग करण्यात आलं आहे.

2.रेल्वे ट्रॅकवर पाणी जमा होऊ नये

रेल्वे रुळांवर पाणी जमा होऊ नये म्हणून ठराविक अंतरानंतर क्रॉस ड्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाच्या दरम्यान रेल्वे रुळ किंवा रेल्वे स्टेशनवरील पाणी उपसा करण्यासाठी मोटार पंप आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे.

3.मान्सून पेट्रोलिंग

मान्सून पावसाच्या काळात रेल्वे रुळांची सुरक्षा लक्षात घेता सामान्य पेट्रोलिंग सोबत ‘मॉनसून पेट्रोलिंग’ ची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याद्वारे रेल्वे रुळांची पाहणी करण्यात येईल.

4.IMD आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय

रेल्वे विभाग मान्सूनच्या काळात आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या रेल्वे विभागाच्या संपर्कात राहणार आहे. याशिवाय भारतीय हवामान विभागाशी देखील रेल्वे विभाग समन्वय साधणार आहे. यामुळे रेल्वेला पाऊस आणि पुरासंबंधी अतिरिक्त माहिती उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या:

तुम्हाला LKG आणि UKG चा फुलफॉर्म माहिती आहे का?

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही

Indian Railway Prepare for monsoon train services not stopped due to heavy rains and flood

...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.