AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Rule : काम तर नाही बदलले, पण नावात झाला बदल, रेल्वे कर्मचाऱ्यांना मनात फील गुड..

Railway Rule : रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांची एक मागणी केल्याने आता त्यांच्या पदनामात बदल होणार आहे..काय आहे नवीन पदनाम..

Railway Rule : काम तर नाही बदलले, पण नावात झाला बदल, रेल्वे कर्मचाऱ्यांना मनात फील गुड..
नाम बदल गया बाबूImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 10, 2022 | 8:47 PM
Share

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी (Railway Passengers) महत्वाची बातमी. आता तुमच्या ट्रेनमध्ये गार्ड (Railway Guard) नसेल. रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी केली आहे. त्यानुसार आता रेल्वे गार्डचे पदनाम (Post Name) बदलविण्यात आले आहे. त्यामुळे नावात काय नसते, अशी चर्चा रंगली आहे. या नवीन निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

या नवीन नियमानुसार रेल्वेत तैनात असणारे रेल्वे गार्डचे (Train Guard) पदनाम बदलविण्यात आले आहे. त्यांना आता ट्रेन मॅनेजर (Train Manager) असे नवीन पदनाम देण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाने (Railway Board) याविषयीचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने याविषयीचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचे पत्र ही सर्व विभागांना पाठविले आहे. या नवीन नावामुळे रेल्वे कर्मचारी खूप उत्साहित आहेत. गेल्या वर्षी रेल्वे कर्मचारी युनियने काही पदनामे बदलण्याची मागणी केली होती.

रेल्वे मागणी मंजूर करताच तात्काळ प्रभावाने पदनाम बदलविण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची मागणी या वर्षाच्या सुरुवातीलाच मंजूर करण्यात आली होती. भारतीय रेल्वेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरुन याविषयीची घोषणा ही केली होती.

कर्मचारी 2004 पासून रेल्वे गार्ड हे पदनाम बदलण्याची मागणी करत होते. गार्डचे काम केवळ सिग्नलवर हिरवा झेंडा दाखविणे आणि टॉर्च दाखविणे एवढेच गार्डचे काम उरलेले नाही, त्यामुळे पदनाम बदलवावे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती.

कर्मचाऱ्यांचे पदनाम जरी बदलले तरी त्यांच्या कामात मात्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यांच्याकडील कामाची जबाबदारी पूर्वीसारखीच आहे. प्रवाशांची सुरक्षा, ट्रेनची देखरेख, पार्सल सामानाची जबाबदारी तसेच इतर सर्व जबाबदाऱ्या त्यांच्याच खांद्यावर आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, पदनाम बदलण्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामात कुठलाही बदल झालेला नाही. त्यांना नियोजीत कामे करावी लागतील. त्यांना ही कामे पूर्वीप्रमाणेच करावी लागणार आहेत.

असिस्टंट गार्ड, गुड्स गार्ड, सिनिअर गुड्स गार्ड, सिनिअर पॅसेंजर गार्ड, मेल, एक्सप्रेस गार्ड ही पदनामे आता इतिहास जमा झाली आहेत. त्यांच्या गार्ड या पदनामाऐवजी आता मॅनेजर असा उल्लेख करण्यात येणार आहे.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.