SHARE TRACKER: घसरणीनंतर तेजीचं सत्र, सेन्सेक्स 436 अंकांनी वधारला; निफ्टीत वाढ
आज सेंसेक्स वर 20 आणि निफ्टी वर 29 शेअरची कामगिरी वधारणीची राहिली. सेन्सेक्स आज (गुरुवार) 436.94 अंकांच्या वाढीसह 55,818.11 आणि निफ्टी 105.25 अंकांच्या तेजीसह 16,628.00 वर बंद झाले.
नवी दिल्लीः जागतिक अर्थपटलावरील घसरणीचं सावट भारतीय शेअर बाजारावर (INDIAN SHARE MARKET) उमटलं. व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी यांची घसरण झाली होती. मात्र, रिलायन्स आणि बजाज फिनसर्व्ह स्टॉक्समधील तेजीमुळं बाजार सावरला. आज सेंसेक्स वर 20 आणि निफ्टी वर 29 शेअरची कामगिरी वधारणीची राहिली. सेन्सेक्स आज (गुरुवार) 436.94 अंकांच्या वाढीसह 55,818.11 आणि निफ्टी 105.25 अंकांच्या तेजीसह 16,628.00 वर बंद झाले. रिलायन्स (RELIANCE) आणि बजाज फिनसर्व्ह मध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. सेन्सेक्स वर बँकिंग शेअरमध्ये (BANKING SHARES) संमिश्र स्वरुप राहिलं. निफ्टी वर आयटी शेअर्समध्ये 1.82 टक्क्यांच्या तेजी नोंदविली गेली. निफ्टी बँक मध्ये 0.02 टक्क्यांची घसरण झाली. आज बँक, ऑटो आणि फायनान्शियल्स सर्व्हिसेसचे निफ्टी निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्स वर सर्वाधिक खरेदी-विक्री:
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर सर्वाधिक खरेदी रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह आणि सनफार्मा मध्ये दिसून आली. सर्वाधिक विक्रीचा जोर एचडीएफसी, पॉवरग्रिड आणि एचयूएल मध्ये राहिला.
निफ्टी 50 सर्वाधिक खरेदी-विक्री:
आज व्यवहाराच्या अखेरीस निफ्टी वर रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह आणि सनफार्मा सर्वाधिक तेजीसह बंद झाले. तर अपोलो हॉस्पिटल, हिरो मोटोकॉर्प आणि आयशर मोटर्स मध्ये घसरण नोंदविली गेली.
एलआयसीची नीच्चांकी घसरण
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध (लिस्टेड) झाल्यानंतर एलआयसी शेअर घसरणीनंतर नीच्चांकी पातळीवर पोहोचला. सवलतीसह सूचीबद्ध झाल्यानंतर एनएसई वर एलआयसी शेअर 52 आठवड्यांच्या सर्वात नीच्चांकी स्तरावर 801 रुपये प्रति शेअर वर पोहोचला. एलआयसीच्या प्रति शेअर 949 रुपये इश्यू प्राईसपेक्षा 150 हून अधिक रुपयांनी कमी आहे. आज (गुरुवारी)एलआयसीच्या एका शेअरची किंमत 804.95 रुपयांच्या नजीक आहे
विकास दर वाढणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च टीमने वित्तीय वर्ष 2022-23 साठी भारतीय अर्थव्यवस्थेत 0.2% वाढीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे विकास दर 7.5% वर पोहोचण्याची शक्यता आहे.