Bonus : 7-8 हजार, छे हो, या कंपनीने दिला एवढा बोनस, दोन हप्त्यात होणार वाटप, कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले

Bonus : दिवाळीत थोडा जरी बोनस मिळाला तर आपल्याला आभाळ ठेंगणे होते, पण या कंपनीने तर जोरदार बोनस दिले आहे..

Bonus : 7-8 हजार, छे हो, या कंपनीने दिला एवढा बोनस, दोन हप्त्यात होणार वाटप, कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले
बम्पर बोनसImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 3:40 PM

नवी दिल्ली : दिवाळी (Diwali) आली की बोनसचा (Bonus) विषय निघत नाही, असे होत नाही. बोनस शिवाय दिवाळी अपूर्ण वाटते. अनेकदा दिवाळीसाठी व्यवस्थापनावर (Management) दबावही टाकण्यात येतो. भारतात काही कंपन्या 7-8 हजार बोनस रुपात देतात. तर काही कंपन्या 20 हजारांपर्यंतही बोनस वाटप करतात. पण या कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला बम्पर बोनस वाटप केला आहे.

अर्थातच ही कंपनी भारतीय नाही. तर ही कंपनी आहे इंग्लंडमधली. 7-8 हजार रुपयांचा बोनस या ब्रिटिश कंपनीच्या गावी ही नाही. ही कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्याला 56 हजार रुपयांचा बोनस प्रत्येक कर्मचाऱ्याला देणार आहे.

इनोप्लास टेक्नोलॉजी लिमिटेड (Inoplas Technology Limited) असे या कंपनीचे नाव आहे. तिने कर्मचाऱ्यांना हा बम्पर बोनस जाहीर केला आहे. महागाईपासून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक मदद मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या ग्रेट ब्रिटनमध्ये महागाई कमालीची वाढली आहे. त्यामुळे ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’ वाढली आहे. नागरिकांवरील आर्थिक बोजा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे सुरु केले आहे.

इनोप्लास टेक्नोलॉजी लिमिटेड (Inoplas Technology Limited) व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. कंपनीच्या या निर्णयाने कर्मचारी प्रचंड खूष आहेत.

बोनसची ही मोठी रक्कम तात्काळ कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. अर्धा बोनस या ऑक्टोबर महिन्यात जमा होणार आहे. तर उर्वरीत बोनस जानेवारी महिन्यात जमा होणार आहे.

कंपनीचे संचालक बॉब डेविस यांच्या मते कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचणीत थोडी मदत करण्याचा हा कंपनीचा प्रयत्न आहे. यामुळे कर्मचारी घर भाडे, लाईट बिल, औषधी, मुलांचे शिक्षण यासाठी काहीप्रमाणात ही रक्कम खर्च करू शकतील.

कंपनीने सौरऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. नवीन उपकरणात कंपनी गुंतवणूक करणार आहे. कंपनी सोलर पॅनल तयार करणार आहे. त्यामुळे सध्या महागड्या वीजेपासून कर्मचाऱ्यांची आणि नागरिकांची सूटका करता येईल.

सध्या इंग्लंडमध्ये महागाई तिच्या रेकॉर्डस्तरावर आहे. सप्टेंबर महिन्यात महागाई दर 40 वर्षांच्या उच्चस्तरावर आहे. सध्या महागाई दर 10.1 टक्क्यांवर पोहचला आहे. 1982 नंतर जुलै 2022 मध्ये महागाईने विक्रम मोडीत काढले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.