फेसबुक, गुगल आणि अॅपलमध्ये गुंतवणूक करा, 29 ऑक्टोबरपर्यंत संधी, जाणून घ्या सर्वकाही
या फंडामुळे फेसबुक, गुगल आणि अॅपलसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी भारतीयांना मिळेल. नॅस्डॅक हा अमेरिकेच्या शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. जर तुम्ही या फंडात गुंतवणूक केली तर हा फंड तुमचे पैसे जगातील 100 मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवेल.
मुंबई: जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जागतिक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याची संधी आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाने नॅस्डॅक 100 फंड ऑफ फंड (FoF) लाँच केला आहे. हा ओपन-एंडेड एफओएफ आहे. यामध्ये परदेशी ईटीएफ किंवा नास्डॅक 100 इंडेक्स आधारित इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक केली जाईल.
या फंडामुळे फेसबुक, गुगल आणि अॅपलसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी भारतीयांना मिळेल. नॅस्डॅक हा अमेरिकेच्या शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. जर तुम्ही या फंडात गुंतवणूक केली तर हा फंड तुमचे पैसे जगातील 100 मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवेल. त्यामुळे तुम्ही भारतात बसून जगातील या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून नफा कमवू शकता. हा फंड गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे ज्यांना त्यांच्या इक्विटी वाटपात भौगोलिकदृष्ट्या इंडेक्स फंडांमध्ये विविधता आणायची आहे. या इंडेक्सची मार्केट कॅप $ 18 ट्रिलियन आहे. हा निर्देशांक अमेरिकेच्या बाजारात चांगली कामगिरी करतो.
29 ऑक्टोबरपर्यंत संधी
बिर्लाची नवीन फंड ऑफर (NFO) 15 ऑक्टोबरपासून खुली आहे आणि 29 ऑक्टोबर रोजी बंद होईल. यामध्ये किमान 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. नॅसडॅक 100 इंडेक्सने गेल्या 20 वर्षांत चारपटीने वाढ केली आहे. अमेरिकन बाजारपेठेत गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. याचा फायदा केवळ विकसित देश आणि प्रौढ बाजारपेठांना होत नाही, तर हे बाजार गुंतवणूकदारांना थीममध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते. यात क्लाउड कॉम्प्युटिंग, ई-कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी थीम समाविष्ट आहेत. या प्रकारच्या थीम भारतात फार मोठ्याप्रमाणावर उपलब्ध नाहीत.
नॅस्डॅकची आतापर्यंतची कामगिरी कशी?
गेल्या तीन वर्षात, नॅस्डॅक 100 निर्देशांकाने 29.1% परतावा दिला आहे, तर निफ्टी 50 TRI ने त्याच कालावधीत केवळ 15.2% परतावा दिला आहे. 5 वर्षात निफ्टीने 18.8% परतावा दिला आहे तर नास्डॅक 100 निर्देशांकाने 34.6% परतावा दिला आहे. नॅस्डॅक 100 निर्देशांकाने 10 वर्षांत 31.2% परतावा दिला आहे, निफ्टी 50 TRI ने 13.6% परतावा दिला आहे. नॅस्डॅक 100 निर्देशांक हा प्रामुख्याने लार्ज कॅप ग्रोथ इंडेक्स आहे.
नास्डॅक 100 निर्देशांकात आयटी क्षेत्राचा वाटा 44%आहे. दळणवळण सेवांचा वाटा 29%आहे. ग्राहक क्षेत्राचा वाटा 15%आहे. 15 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. आज त्याचे 2.37 अब्ज वापरकर्ते आहेत. अॅमेझॉन कंपनी 20 वर्षांपूर्वी सुरू झाला. अमेरिकेच्या बाजारात त्यांचा 40% वाटा आहे.
संबंधित बातम्या:
Petrol Diesel price: मोदी सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणार?
जाणून घ्या राकेश झुनझुनवालांनी पोर्टफोलिओमधील कोणते पाच समभाग विकले?
बाँडसच्या माध्यमातून एसबीआयने उभारला 6000 कोटींचा निधी; काय असतात AT1 बाँड?