Mutual Fund : जास्त द्याल तर जादा कमवाल, एकदम सोप्पं गणित! काय आहे Step Up SIP

Mutual Fund : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी एक ट्रिक्स वापरल्यास तुम्हाला जादा कमाई होईल. Step Up SIP च्या माध्यमातून ही गोष्ट साध्य होईल. पण काय आहे हा प्रकार...

Mutual Fund : जास्त द्याल तर जादा कमवाल, एकदम सोप्पं गणित! काय आहे Step Up SIP
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 8:04 PM

नवी दिल्ली : म्युच्युअल फंडात नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना, तुम्ही आतापर्यंत अनेकदा वाचले असेल. एसआयपीच्या (SIP) माध्यमातून गुंतवणूक करता येते आणि चांगला परतावा मिळविता येतो. दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवून तुम्हाला मोठा फंड तयार करता येतो. त्यावर चक्रवाढ व्याजाचाही लाभ मिळेल. पण तुम्हाला म्युच्युअल फंडातून तुम्हाला अधिक कमाई करायची असेल तर एक ट्रिक्स तुम्हाला अधिक फायदेशीर ठरेल. Step Up SIP च्या माध्यमातून ही गोष्ट साध्य होईल. पण काय आहे हा प्रकार, त्याचा काय फायदा होतो, त्याचा वापर कसा कराल?

हे उदाहरण येईल कामी एसआयपी गुंतवणूक समजून घेणे आवश्यक आहे. एखादा गुंतवणूकदार दरमहा 10000 रुपये गुंतवत असेल तर त्याचे गणित समजून घ्या. ही गुंतवणूक 10 वर्षांसाठी कराल. त्यावर सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा मिळेल, असा गृहित धरावा. तुम्ही 12,00,000 रुपये गुंतवाल, तर 23,23,391 रुपयांचे एकूण रिटर्न मिळेल. म्हणजे तुम्हाला 11,23,391 रुपयांचा लाभ होईल. गुंतवणूक 15 वर्षांसाठी करत असाल तर 50,45,760 रुपये रक्कम मिळेल. जर तुम्ही गुंतवणूक वाढवली तर 20 वर्षानंतर 99,91,479 रुपये रक्कम जमा होईल.

स्टेप अप एसआयपी स्टेप अप एसआयपीचा फायदा काय आहे, हे समजून घ्या. प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये एसआयपी जमा करत असाल, वार्षिक 10 टक्के दराने स्टेप अप एसआयपी कराल. तर दरवर्षी तुम्ही जमा करत असलेल्या रक्कमेत 10 टक्के अधिक रक्कम जमा कराल. जर तुम्हाला वार्षिक 12 टक्के परतावा मिळाला. तर 10 वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणूक 19,12,491 रुपये होईल. त्यावर तुम्हाला जवळपास 31,84,832 रुपयांचा परतावा मिळेल. याठिकाणी तुम्हाला 12,72,341 लाख रुपयांचा फायदा होईल. जर तुम्ही 15 वर्षांकरीता गुंतवणूक कराल तर ही रक्कम 81,78,244 रुपये होईल. जर ही गुंतवणूक अधिक वाढवली तर 20 वर्षानंतर तुमच्याकडे 1,87,10,327 रुपये असतील.

हे सुद्धा वाचा

असे मिळते कर्ज इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुमची एकूण संपत्ती किती आहे, त्याच्या मूल्यावर 50 टक्क्यांपर्यंत कर्ज रक्कम मिळते. तर म्युच्युअल फंडमधील निश्चित कमाईच्या मूल्यावर 70 ते 80 टक्के कर्ज मिळते. त्यामुळे कर्ज मिळविताना त्याचा वापर होतो. इतर कर्जाप्रमाणेच तुम्ही पण म्युच्युअल फंडावर बँका, वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवू शकता. काही बँका तर ऑनलाईन कर्ज मंजूर करतात. त्यासाठी कमी कागदपत्रे लागतात. ऑनलाईन कर्जासाठी अर्ज करावा लागेल. एकदा त्याला मंजूरी मिळाली की काही दिवसात तुमच्या खात्यात रक्कम जमा होते.

वैयक्तिक कर्जापेक्षा म्युच्युअल फंडवरील कर्जावर कमी शुल्क आकारल्या जाते. हे कर्ज इतर कर्जापेक्षा स्वस्त मानण्यात येते. यासाठीचे प्रक्रिया शुल्कही कमी आकारण्यात येते. तर वैयक्तिक कर्जासाठी तुम्हाला जादा प्रक्रिया शुल्क द्यावे लागते. काही बँका प्रक्रिया शुल्क आणि इतर खर्च माफ करते.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.