Investment advice : जागतिक मंदीत सोने खरेदीची संधी; सोन्या-चांदीच्या दरात तेजी येणार, जाणून घ्या सध्या गुंतवणूक करावी का?

वाढती महागाई आणि आर्थिक मंदीच्या भीतीनं येत्या काही दिवसात सोन्याच्या भावात तेजी पहायला मिळू शकते. 2022 च्या शेवटपर्यंत जागतिक बाजारात सोन्याचे दर 2000 डॉलरपर्यंत पोहचू शकतात असा अंदाज आहे.

Investment advice : जागतिक मंदीत सोने खरेदीची संधी; सोन्या-चांदीच्या दरात तेजी येणार, जाणून घ्या सध्या गुंतवणूक करावी का?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 12:13 PM

मुंबई : जगभरात महागाईनं (Inflation) उच्चांक गाठलाय. आर्थिक संकटाचं ढग गडद झाले आहेत. म्हणजेच सोन्याच्या (gold) गुंतवणुकीत वाढ होण्यासाठी पुरक वातावरण आहे. मात्र, तरीही सोने बाजारात फारसा उत्साह नाही. जागतिक बाजारात बऱ्याच दिवसांपासून सोन्याचा भाव 1800 आणि 1850 डॉलरच्या जवळपास आहे. देशातही सोन्याचा भाव 50 ते 51 हजार आहे. चांदीचीही (Silver) अशीच परिस्थिती आहे. चांदीचाही दर 60 ते 62 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. सोन्या, चांदीच्या दरावर डॉलर भारी पडत आहे. अमेरिकेने व्याज दरात वाढ केल्यानं डॉलर मजबूत झालाय. डॉलर इंडेक्स 20 वर्षांच्या उच्चाकांवर असल्यानं जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सुस्ती आहे. मात्र दुसरीकडे रुपया कमजोर झाल्यानं भारतीय बाजारात थोडंसं सहाय्य मिळालंय. मात्र, आर्थिक मंदीच्या भीतीनं वैश्विक बाजारात सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढू शकते. जगभरातील अनेक केंद्रीय बँका सोन्याच्या साठ्यात वाढ करत आहेत. मेच्या दरम्यानं आरबीआयनं सुद्धा 3.7 टन सोनं खरेदी केलंय. केंद्रीय बँका सोनं खरेदी करत असल्यामुळे सोन्याच्या दराला सपोर्ट मिळालाय.

महागाईमुळे सोन्याचा दर वधारणार

वाढती महागाई आणि आर्थिक मंदीच्या भीतीनं येत्या काही दिवसात सोन्याच्या भावात तेजी पहायला मिळू शकते. 2022 च्या शेवटपर्यंत जागतिक बाजारात सोन्याचे दर 2000 डॉलरपर्यंत पोहचू शकतात आणि असं झाल्यास भारतात रुपयाची किंमत पडल्यामुळे सोन्याचे भाव 55000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असे केडिया एडवायजरीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी म्हटले आहे. 2022 च्या दुसऱ्या सहा महिन्यांत चांदीच्या किंमतीत देखील वाढ होऊ शकते . पुढील सहा महिन्यांत भारतात चांदीचे दर 66000 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेलिगेयर कमोडिटीजच्या व्हाईस प्रेसिडेंट सुगंधा सचदेव यांनी दिलीये.

हे सुद्धा वाचा

मंदीत तेजी

2008 सालच्या मंदीतही सोन्या आणि चांदीच्या दरात तेजी आली होती. यंदाही जागतिक मंदीचे संकट गडद झालंय. मंदीचा जुना अनुभव लक्षात घेता आता सोनं आणि चांदीच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच सध्या सोन्या-चांदीचे दर कमी असल्यामुळे त्यामधील गुंतवणूक देखील वाढण्याची शक्यता आहे. सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाल्यास सोन्याचे दर आपोआप वाढणारच आहेत.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.