Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा सुगीचे दिवस, IPO मधून होऊ शकते कमाई! येत्या तीन महिन्यात गुंतवणुकीच्या नव्या संधी 

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गुंतवणूकदारांना आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे गेल्या वर्षीही गुंतवणूकदार मालामाल झाले होते यंदा गुंतवणूकदारांना आयपीएलच्या खरेदीमध्ये सुगीचे दिवस बघायला मिळतील मार्च महिन्यापर्यंत एकूण 23 कंपन्या खुल्या बाजारात आपला दम आजमावणार आहेत.

गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा सुगीचे दिवस, IPO मधून होऊ शकते कमाई! येत्या तीन महिन्यात गुंतवणुकीच्या नव्या संधी 
मार्केटमध्ये पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 12:30 PM

मुंबई : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गुंतवणूकदारांना आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे गेल्या वर्षीही गुंतवणूकदार मालामाल झाले होते यंदा गुंतवणूकदारांना आयपीएलच्या खरेदीमध्ये सुगीचे दिवस बघायला मिळतील मार्च महिन्यापर्यंत एकूण 23 कंपन्या खुल्या बाजारात आपला दम आजमावणार आहेत.

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात गुंतवणूकदारांसाठी खुल्या बाजारात कमाईची मोठी संधी उपलब्ध होत आहे. 23 कंपन्या त्यांचे आयपीओ बाजारात उतरवणार आहेत. या माध्यमातून तब्बल 44 हजार कोटी  रुपयांची उभारणी करण्यात येणार आहे. यापूर्वी 2021 मध्ये 63 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून 1.2 लाख कोटी रुपयांची राशी जमा केली होती

या कंपन्यांचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता

व्यवसायिक बँकांच्या अंदाजानुसार येत्या मार्च महिन्यापर्यंत या 23  कंपन्या पैसा जमा करण्यासाठी खुल्या बाजारात आयपीओची विक्री करू शकतात. यामध्ये ओयो (8430 कोटी)डिलेव्हरी  (7460 कोटी)  याशिवाय अडाणी विल्मर (4500 कोटी)  एम केअर फार्मासिटिकल (4000 कोटी)  वेदांत फॅशन (2500 कोटी)  पारादीप फॉस्फेट (2200 कोटी)  मेदांता( 2000 कोटी)  इक्सीगो (800 कोटी) यांचा आयपीओ या तीन महिन्यांत खुल्या बाजारात दाखल होऊ शकतो.

गेल्या वर्षी तीन महिन्यांत 40 कंपन्यांची सेबीकडे धाव घेतली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2021 या तीन महिन्यांमध्ये जवळपास 40 कंपन्यांनी बाजार नियामक सेबीकडे आयपीओ साठी धाव घेतली होती यामध्ये ओला,बायजू  यासारख्या नवीन दमाच्या स्टार्टअपचा समावेश होता. जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक असलेली भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीचा ही या यादीमध्ये समावेश आहे. प्राथमिक अंदाजानुसार एलआयसीचा आयपीओ 80 हजार ते एक लाख कोटी रुपयांचा असू शकतो.

शेअर बाजार गेल्या वर्षी गुंतवणुकदारांना मालामाल केले होते. एकापेक्षा एक सरस अशा कंपन्यांनी आयपीओ आणल्यामुळे नवीन गुंतवणूकदारांची ही चांगली चांदी झाली होती. सरत्या वर्षात जानेवारी महिन्यापासून एकूण 63 कंपन्यांनी आयपीओ बाजारात आणले होते. या सर्वांनी मिळून बाजारातून सुमारे 1. 29 लाख कोटी रुपये उभे केले. गेल्या अनेक वर्षांपासून एका वर्षात आयपीओ मधून जमा झालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. यापूर्वी 2017 मध्ये कंपन्यांनी खुल्या बाजारातून 75 हजार कोटी रुपये उभे केले होते.

हेही वाचा :

युनियन आणि सेंट्रल बँकांची ग्राहकांसाठी खास योजना, 9 टक्‍क्‍यांपेक्षा कमी व्याजने व्यक्तिगत कर्ज 

असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

डिजिटल करन्सीसाठी चालू वर्ष कसे राहणार?; जाणून घ्या क्रिप्टोमधील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञाचे मत

2021 मध्ये शेअर बाजारामधून चांगला परतावा; गुंतवणूकदार झाले मालामाल, चालू वर्षातील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञांचं मत काय?