रेल्वेसोबत करा कमाई, दर महिन्याला मिळवता येईल 80 हजार रुपये

भारतीय रेल्वेने आणलेल्या अनोख्या योजनेमुळे तुम्हाला दर महिन्याला 80 हजार रुपये कमवता येणार आहे. यामुळे नोकरीचे टेन्शन सोडून रेल्वेच्या IRCTC शी सोबत काम करता येणार आहे. यामाध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येणार आहे.

रेल्वेसोबत करा कमाई, दर महिन्याला मिळवता येईल 80 हजार रुपये
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 4:10 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची नोकरी प्रत्येकाला हवी असते. कारण रेल्वेत चांगला पगार आणि अनेक सुविधा मिळत असतात. परंतु लगेच नोकरी मिळणेही सोपे नाही. सध्या नोकरीचे टेन्शन न घेताही भारतीय रेल्वेसोबत काम करता येणार आहे. रेल्वेने आणलेल्या अनोख्या योजनेमुळे तुम्हाला दर महिन्याला 80 हजार रुपये कमवता येणार आहे. यामुळे नोकरीचे टेन्शन सोडून रेल्वेच्या IRCTC शी सोबत काम करुन कमवण्याची चांगली संधी आहे. ही संधी अत्यंत कमी गुंतवणुकीत साधता येणार आहे.

काय आहे संधी

भारतीय रेल्वेची सहयोगी कंपनी IRCTC ला रेल्वे तिकिटांसाठी एजंट म्हणून नियुक्त केले आहे. यामुळे तुम्ही IRCTC सोबत रेल्वे एजंट बनू शकतात. ज्या पद्धतीने रेल्वे काउंटरवर तिकिटांची विक्री क्लार्ककडून केली जाते, तसेच IRCTC चे एजंट म्हणून तुम्हाला तिकिटांची विक्री करता येते. त्यासाठी तुम्हाला चांगले कमिशन मिळते. या पद्धतीने तुम्ही ई-तिकिटांची बुकींग करु शकतात.

हे सुद्धा वाचा

कमीशनच्या माध्यमातून कमाई

एजंट म्हणून तुम्हाला चांगले कमिशन मिळते. एक नॉन एसी कोटमधील तिकीट बुक केल्यास 20 रुपये प्रति टिकट तुम्हाला मिळतात. एसी क्लाससाठी 40 रुपये प्रति टिकट कमीशन दिले जाते. तसेच तिकिटाच्या किंमतीचा एक टक्का रक्कमही एजंटला दिली जाते. IRCTC एजंटसाठी तिकीट बुक करण्याचे कोणतीही मर्यादा नाही. त्यात तुम्हाला कितीही तिकीट बुक करता येतात. तसेच 15 मिनट तत्काल बुकींगची पर्याय आहे. एजंट म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानांचे तिकीट तुम्हाला काढता येते.

80,000 रुपये कमवता येईल

एजंट म्हणून तिम्ही महिन्याला कितीही तिकिटांची बुकींग करु शकतात. त्याला मर्यादा नाही. जर तुम्ही चांगली बुकींग केली तर दर महिन्याला 80,000 रुपयांपर्यंत रक्कम तुम्हाला मिळेल. जर काम साधारण राहिले तरी 40-50 हजार रुपये तुम्हाला कमवता येईल.

किती असते गुंतवणूक

IRCTC चा एक, दोन वर्षांसाठी बनता येतो. एका वर्षासाठी 3,999 रुपये तर दोन वर्षांसाठी 6,999 रुपये शुल्क भरावे लागते. तसेच एजंट म्हणून दर महिन्याला 100 तिकीट बुक केल्यास प्रती तिकीट 10 रुपये तुम्हाला द्यावे लागतील.

रेल्वेचा चार दिवसांचा मेगा ब्लॉक, अनेक एक्स्प्रेस रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलले…वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.