AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधार कार्डवरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची आहे? या कागदपत्रांद्वारे करा अपडेट

आधार कार्ड बहुतांश ठिकाणी वैध आहे. पण अनेक लोकांना आधारावर घराचा पत्ता किंवा जन्मतारखेत काही चूक असणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र आता आपल्याला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही.

आधार कार्डवरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची आहे? या कागदपत्रांद्वारे करा अपडेट
आधार कार्डवरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची आहे? या कागदपत्रांद्वारे करा अपडेट
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 7:26 PM

Aadhar Card Update : आजकाल जवळजवळ प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. आधार कार्ड बहुतांश ठिकाणी वैध आहे. पण अनेक लोकांना आधारावर घराचा पत्ता किंवा जन्मतारखेत काही चूक असणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र आता आपल्याला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ते अपडेट करू शकता. आधार कार्डवर जन्मतारीख किंवा घरचा पत्ता अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे दाखवली जाऊ शकतात ते जाणून घेऊ. (Is the address or date of birth on Aadhar card wrong, Update through these documents)

जन्मतारीख अपडेट करण्यासाठी

जर तुम्हाला तुमची जन्मतारीख आधार कार्डवर अपडेट करायची असेल तर आम्ही तुम्हाला सांगू की यासाठी एकूण 15 कागदपत्रे वैध आहेत. ते पुढालप्रमाणे

– जन्म प्रमाणपत्र – SSLC पुस्तक किंवा प्रमाणपत्र – पासपोर्ट – UIDAI मानक प्रमाणपत्र स्वरुपात गट A राजपत्रित अधिकाऱ्याने जारी केलेल्या जन्मतारखेचे प्रमाणपत्र – शासकीय प्राधिकरणाने जारी केलेले दुहेरी स्वाक्षरी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र ज्यामध्ये छायाचित्र आणि जन्मतारीख आहे – जन्मतारीख असलेल्या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेने जारी केलेला फोटो आयडी – पॅन कार्ड – कोणत्याही शासकीय मंडळ किंवा विद्यापीठाने जारी केलेले मार्कशीट – जन्मतारीख असलेले शासकीय फोटो ओळखपत्र – केंद्रीय किंवा राज्य पेन्शन पेमेंट ऑर्डर – केंद्र सरकारची आरोग्य सेवा योजना फोटो कार्ड – शाळा सोडल्याचा दाखला किंवा नाव आणि जन्मतारीख असलेले शाळा हस्तांतरण प्रमाणपत्र – शाळेच्या मुख्याध्यापकाने जारी केलेले शाळेचे रेकॉर्ड ज्यामध्ये नाव, जन्मतारीख आणि छायाचित्र आहे – मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेद्वारे UIDAI मानक प्रमाणपत्र स्वरूपात नाव, जन्मतारीख आणि छायाचित्रासह जारी केलेले ओळख प्रमाणपत्र – नाव, जन्मतारीख आणि छायाचित्रासह UIDAI मानक प्रमाणपत्र स्वरूपनावर EPFO ​​द्वारे जारी केलेले ओळख प्रमाणपत्र.

घरचा पत्ता अपडेट करण्यासाठी

जर तुम्हाला तुमची जन्मतारीख आधार कार्डवर अपडेट करायची असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की यासाठी एकूण 45 दस्तऐवज वैध आहेत. यापैकी काही महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत:

– पासपोर्ट – बँक स्टेटमेंट/ पासबुक – पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट/ पासबुक – रेशन कार्ड – वोटर आयडी – ड्रायव्हिंग लायसन्स – सरकारी फोटो आयडी कार्ड किंवा पीएसयूद्वारे जारी सर्विस फोटो आयडी कार्ड – वीज बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नको) – पाणी बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नको) – टेलिफोन लँडलाईन बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नको) – प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट (तीन महिन्यांपेक्षा जुने नको) – क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (तीन महिन्यांपेक्षा जुने नको) – इंश्युरन्स पॉलिसी – NREGS जॉब कार्ड – आर्म्स लायसन्स – पेंशनर कार्ड – फ्रीडम फायटर कार्ड – किसान पासबुक – CGHS/ ECHS कार्ड – इनकम टॅक्स असेसमेंट ऑर्डर – व्हीकल रजिस्ट्रेशन नंबर – रजिस्टर्ड सेल किंवा लीज किंवा रेंट अॅग्रीमेंट – फोटोसह टपाल खात्याने जारी केलेले अॅड्रेस कार्ड – छायाचित्रासह राज्य सरकारने जारी केलेले जात आणि अधिवास प्रमाणपत्र (Is the address or date of birth on Aadhar card wrong, Update through these documents)

इतर बातम्या

हातावर ‘देवेंद्र’ नावाचा टॅटू, आता म्हणतात, अजित पवारांवरील कारवाईचा निषेध, नरेंद्र पाटलांच्या मनात काय?

मशरुमच्या व्यवसायातून लाखोंची कमाई, तरुणाच्या हातालाही मिळेल रोजगार

प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....