येत्या वर्षात 25 हजार भारतीयांना नोकरी देणार डेन्मार्कची ‘ही’ कंपनी, महसुलाच्या दुप्पट वाढीचे लक्ष

आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस इंडिया ही डेन्मार्कच्या आयएसएस समूहाची उपकंपनी पुढील दोन वर्षांमध्ये भारतात तब्बल 25,000 लोकांना नोकरी देऊ शकते. तसे संकेत कंपनीच्या वतीने देण्यात आले आहेत. येत्या काळात महसुलात दुप्पट वाढ आणि रोजगार निर्मितीचे लक्ष असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

येत्या वर्षात 25 हजार भारतीयांना नोकरी देणार डेन्मार्कची 'ही' कंपनी, महसुलाच्या दुप्पट वाढीचे लक्ष
कामगार मंत्रालयाकडून 112 जागांसाठी भरतीImage Credit source: file
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 7:44 PM

आयएसएस फॅसिलिटी (ISS facility) सर्व्हिसेस इंडिया ही डेन्मार्कच्या (Denmark) आयएसएस समूहाची उपकंपनी पुढील दोन वर्षांमध्ये भारतात तब्बल 25,000 लोकांना नोकरी देऊ शकते. तसे संकेत कंपनीच्या वतीने देण्यात आले आहेत. येत्या काळात महसुलात (revenue) दुप्पट वाढ आणि रोजगार निर्मितीचे लक्ष असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या अंतर्गत पुढील काळत 25 हजारांपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. भारतात 2005 साली या कंपनीने प्रवेश केला होता. 2021 च्या आकडेवारीनुसार या कंपनीचे जागितक उत्पन्न 71 अब्ज डॅनिश क्रोन एवढे असून, तिचे एकूण तीन लाख पन्नास हजारांपेक्षा अधिक कर्मचारी वेगवेगळ्या देशात कार्यरत आहेत. कोरोना काळात जवळपास सर्वच कंपन्यांना मोठा फटका बसला होता. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाले असून, कंपनी कोरोना संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती कंपनी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

800 ग्राहक कंपन्या

याबाबत बोलताना आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस इंडियाचे मुख्याधिकारी अक्ष रोहतगी यांनी याबाबत पीटीआयशी बोलताना सांगितले की, सध्या स्थितीमध्ये भारतात कंपनीच्या एकूण 800 ग्राहक कंपन्या आहेत. 4,500 ठिकाणी आमचे ऑफीस असून, आमच्याकडे 50,000 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. एकूण 23 राज्यांमध्ये आमच्या कंपनीचा सध्या स्थितीमध्ये विस्तार झाला आहे. कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्ष कंपनीला मोठा फटका बसला, मात्र त्यातून आम्ही आता सावरत असून, येणाऱ्या काळात डबल महसून तसेच 25 हजार नव्या नोकऱ्याचे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी रोहतगी यांनी दिली.

कोरोनामुळे मोठा फटका

पुढे बोलताना रोहतगी यांनी म्हटले की, आम्ही आमच्या ज्या ग्राहक कंपन्या आहेत, त्यांना सुरक्षा, स्वच्छता तसेच तांत्रिक सेवा पुरवतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोना संकट होते. कोरोना काळात जवळपास सर्वच कर्मचारी घरून काम करत होते. सर्व ऑफीस देखील बंद होते याचा मोठा फटका हा आम्हाला बसला. सेवामध्ये खंड पडल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले. येणाऱ्या काळात हे नुकसान भरून काढण्याचा आमचा प्रयत्न राहील.

संबंधित बातम्या

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाची आर्थिक कोंडी? सविस्तर वाचा काय होतील परिणाम

नॅनो नंतर आता इलेक्ट्रिक नॅनो लवकरच येणार बाजारात? गाडी पाहून रतन टाटा म्हणाले…

गेल्या आठवड्यात सेन्सेक्सची 1500 अंकांनी घसरगुंडी! तब्बल 3.2 लाख कोटींचा चुराडा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.