घरगुती गॅस लवकर संपतोय तर काळजी करु नका, फक्त हे उपाय करा
तुम्ही घरात वापरत असलेला एलपीजी गॅस जर लवकर संपत असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन तुम्ही गॅस वाचवू शकता. घरगुती गॅस वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत.
मुंबई : आगीचा शोध लागल्यानंतर अनेक वर्षांपर्यंत लोकांनी लाकडं पेटवून त्यावर अन्न शिजवून खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे स्टोव्ह आला, नंतर गॅस आला आणि आता तर विजेवर चालणारी शेगडी देखील उपलब्ध झाली आहे. सर्वसामान्य लोकांच्या घरात अन्न शिजवण्यासाठी गॅसच्या शेगडीचा अधिक वापर होतो. स्वयंपाकासाठी LPG गॅस वापरात आल्यापासून लोकांचा वेळ खूप वाचू लागलाय. अन्न शिजवणे, पाणी उकळणे अनेक कामं आपण यावरच करत असतो. पण LPG गॅस सिलिंडरचा वापर करत असताना त्याची काळजी देखील घेतली जाते. पण तरी देखील गॅस लवकर संपतो. जर तुम्हालाही LPG गॅस वाचवायचा असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
बहुतेक लोक भांडी धुतात आणि स्वयंपाकासाठी थेट गॅसच्या शेगडीवर ठेवतात. पण असे करू नये. कारण ओले भांडे गॅसवर ठेवल्याने त्यासाठी अधिक गॅस लागतो. त्यामुळे आधी ते पुसून घ्यावे. ज्यामुळे गॅस वाया जात नाही.
जेव्हा तुम्ही गॅसवर अन्न शिजवण्यासाठी ठेवाल त्याआधी सर्व तयारी करुन घ्या. मगच स्वयंपाकाला सुरुवात करा. बरेच लोकं आधी भांडी गॅसच्या शेगडीवर ठेवतात आणि नंतर कांदे, टोमॅटो, लसूण इत्यादी भाज्या कापतात. यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस वाया जातो. त्यामुळे असे करणे टाळा.
जर तुम्हाला तुमचा गॅस जास्त काळ टिकवायचा असेल तर तुमच्या गॅस सिलेंडरची गळती नक्की तपासा. अनेक वेळा कळत नाही पण गॅस सिलिंडर हळूहळू गळत राहतो. यामुळे गॅस लवकर संपतो. वेळेत सर्विसिंग करुन घ्या. वेळेत पाईप बदला.
अन्न हे मध्यम आचेवर शिजवले जाते. पण असे बरेच लोक आहेत जे खूप जलद गॅस चालू करून आणि भांडं न झाकता अन्न शिजवतात. त्यामुळे गॅस वाचवायचा असेल तर मध्यम आचेवर शिजवून भांडे झाकून ठेवावा. यामुळे तुमची भरपूर गॅसची बचत होऊ शकते.
सध्या गॅसचे दर हे वाढले आहेत. एक घरगुती सिलेंडर १ हजाराच्या वर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला खात्री लागली आहे. गॅसचे दर जरी वाढत असले तरी देखील त्याची बचत करण्याची सवय आपल्याला असायला हवी.
घरगुती LPG गॅस सिलिंडर बचत करण्यासाठी वरील गोष्टी दर तुम्ही केल्या तरी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. एलपीजी गॅस वाचवण्यासाठी वेळोवेळी तुम्ही त्याचे बर्नर साफ केले पाहिजे. त्यासाठी मेकेनिकची मदत घ्या. स्वयंपाक करण्याआधी बर्नर ओले तर नाही ना हे तपासून घ्या. गॅस धुतांना बर्नरवर देखील शिंतडे उडतात. त्यामुळे त्याची काळजी घ्या.