एक खाते अनेक फायदे; जाणून घ्या पीपीएफ खात्यामधील गुंतवणुकीचे फायदे
पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF- Public Provident Fund) ही दीर्घ काळ चालणाऱ्या बचत योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेंतर्गत तुम्ही एक विशिष्ट रक्कम तुमच्या पीपीएफ खात्यामध्ये जमा करु शकता. यातून तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळतो.
नवी दिल्ली : पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF- Public Provident Fund) ही दीर्घ काळ चालणाऱ्या बचत योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेंतर्गत तुम्ही एक विशिष्ट रक्कम तुमच्या पीपीएफ खात्यामध्ये जमा करु शकता. यातून तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर चांगला परतावा मिळतो. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमधून तुम्ही तुमचा निवृत्तीनंतरचा खर्च भागवू शकता. तुम्हाला निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे काम ही योजना करते. या योजनेचा कालावधी हा साधारणपणे 15 वर्षांचा असतो. मात्र तुम्ही त्याला 20 वर्षांपर्यंत देखील वाढू शकता. जर तुम्हाला काही महत्त्वाच्या कामांसाठी पैशांची गरज लागलीच तर तुम्ही या योजनेमधून काही रक्कम योजनेचा कालावीधी पूर्ण होण्याच्या आधी देखील काढू शकता. आपण आज पीपीएफ खात्याचे काय फायदे आहेत? ही योजना इतर बचत योजनेच्या तुलनेमध्ये कशी फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेणार आहोत.
चांगला व्याजदर
केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला पीपीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात बदल केला जातो. सध्या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. पीपीएफवर मिळणारे व्याज हे इतर कुठल्याही मुदत ठेव योजनेपेक्षा अधिक असते. पीपीएफचा आणखी एक फायदा म्हणजे, तुम्ही पीपीएफचा कालावधी तुमच्या आवश्यकतेनुसार पाच वर्षांपर्यंत वाढू देखील शकता. तसेच मुदत पूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला गरज लागल्यास एका ठरावीक रकमेपर्यंत तुम्ही पैसे देखील काढू शकता.
इनकम टॅक्समध्ये सूट
तुम्ही जर पीपीएफ योजनेंतर्गत पैसे गुंतवले असल्यास तुम्हाला इनकम टॅक्स कायदा 1961 च्या सेक्शन 80 सी अंतंर्गत सूट मिळते. तुम्हाला यातून दीड लाखांपर्यंत फायदा होऊ शकतो. अर्थात हा फायदा तुम्ही या योजनेमध्ये किती पैसे गुंतवले आहेत, त्यावर अवलंबून असतो. पीपीएफ योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम आणि व्याज अशा दोनही उत्पन्नाचे स्त्रोत हे करमुक्त असतात. त्याच्यावर कोणताही कर आकारला जात नाही.
पीपीएफ खात्यावर मिळते लोन
तुम्ही पीपीएफ खात्यावर लोनचा फायदा देखील घेऊ शकता. पीपीएफ खाते उघडल्याच्या तीन वर्षांनंतर तुम्ही लोनसाठी पात्र ठरता. तुम्ही पाच ते सहा वर्षांत परतफेडीच्या मुदतीने पीपीएफ खात्यावर लोन घेऊ शकता. ज्यांना अचानक काही कारणासाठी वैयक्तीक लोनची गरज असते, अशा व्यक्तींना ही योजना फायद्याची ठरू शकते. गोल्ड लोनच्या तुलनेत पीपीएफ खात्यातून मिळणाऱ्या लोनवर आकारण्यात येणारा व्याज दर देखील कमी असतो.
संबंधित बातम्या
मोठी बातमी! एटीएममधून 2000 रुपयांची नोट गायब; आर्थिक वर्षात छपाईच नाही, आता काय?
चांगला क्रेडिट स्कोअरही आता कर्जाची हमी ठरणार नाही, रेटिंग सुधारण्यासाठी ही महत्त्वाची पावले
Gold And Silver Prices Today: सोने आज पुन्हा महागले, नेमका भाव किती?