AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात 1 लाख फ्रंटलाइन वर्कर तयार होणार, सरकार प्रशिक्षणासोबत पैसेही देणार, वाचा सविस्तर

कोरोना साथीरोगाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीय.

देशात 1 लाख फ्रंटलाइन वर्कर तयार होणार, सरकार प्रशिक्षणासोबत पैसेही देणार, वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 3:42 AM

नवी दिल्ली : कोरोना साथीरोगाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीय. यानुसार देशभरात 1 लाख फ्रंटलाईन वर्कर तयार केले जाणार आहेत. त्यांना सरकार प्रशिक्षणासोबत पैसेही देणार आहे. यासाठी ‘कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स प्रोग्राम’ लाँच करण्यात आलाय. यात 6 क्रॅश कोर्सचा समावेश आहे. त्यामध्ये कमीत कमी वेळेत तरुणांना कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित केलं जाईल. हा कोर्स MSDE (कौशल्य विकास आणि उद्योजकता) मंत्रालय आणि ‘स्किल इंडिया’ अंतर्गत सुरू करण्यात आलाय (Know all about Customized crash course for Covid 19 healthcare frontline workers amid corona third wave) .

हा कार्यक्रम 26 राज्यांमधील 111 ट्रेनिंग सेंटर्समध्ये लाँच करण्यात आलाय. यामुळे नोकरीच्या संधी तयार होतील असा दावा केला जातोय. या कोर्समध्ये जवळपास 1 लाख तरुणांना प्रशिक्षण देऊन फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून तयार करण्यात येईल.

जेवण, राहणं आणि मानधन देणार

‘कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स प्रोग्राम’ अंतर्गत देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये कलेक्शन सपोर्ट आणि मेडिकल इक्विपमेंट सपोर्ट सारख्या विशिष्ट कामांसाठी प्रशिक्षण दिलं जाईल. हे प्रशिक्षण मोफत दिलं जाणार असून त्यासोबत जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय या कामासाठी मानधन देखील दिलं जाणार आहे. याबरोबर यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या फ्रंटलाईन वर्करला 2 लाख रुपयांचा अपघाती विमा दिला जाणार आहे.

सरकारकडून किती निधी उपलब्ध

कोविड-19 हेल्थकेयर फ्रंटलाइन वर्कर्सच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमासाठी क्रॅश कोर्स योजनेंतर्गत 273 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. तरुणांना फ्रंटलाइन वर्कर्स बनवण्यासाठी स्किल इंडियाने 6 नवे अभ्यासक्रम तयार केलेत. “COVID फ्रंटलाइन वर्करचा (होम केयर सहायक)” कोर्स पूर्ण केल्यानंतर संबंधित तरुणांना गृह स्वास्थ्य सहयोगी म्हणून काम करता येणार आहे.

कोणते 6 नवे अभ्यासक्रम उपलब्ध?

  1. बेसिक केयर सहायक
  2. अॅडव्हान्स केयर सहायक
  3. होम केयर सहायक
  4. आपातकालीन केयर सहायक
  5. सँपल कलेक्शन सहायक
  6. चिकित्सा उपकरण सहायक

हेही वाचा :

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी, शनिवारपासून राज्यात 30 ते 44 वयोगटासाठी लसीकरणास सुरुवात

पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, ‘नोव्हाव्हॅक्स’च्या लसीची ‘सीरम’कडून ट्रायल

कोरोना काळात भारतीयांनी सर्वात जास्त पैसे स्विस बँकेत टाकले, 13 वर्षांचा विक्रम मोडला

व्हिडीओ पाहा :

Know all about Customized crash course for Covid 19 healthcare frontline workers amid corona third wave

'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे.
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर.
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट.
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण..
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण...
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.