PF अकाऊंट ट्रान्सफर करताता ‘या’ गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा अर्धेच पैसे येतील

पगारी नोकरदारांसाठी वेतनातून नियमितपणे एक विशिष्ट रक्कम पीएफच्या रुपात बाजूला पडून बचत होते. याच पीएफ खात्यातील बचत त्यांच्या भविष्यासाठी उपयोगात येणार असते.

PF अकाऊंट ट्रान्सफर करताता 'या' गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा अर्धेच पैसे येतील
पीएफ अकाऊंट
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 9:13 PM

मुंबई : पगारी नोकरदारांसाठी वेतनातून नियमितपणे एक विशिष्ट रक्कम पीएफच्या रुपात बाजूला पडून बचत होते. याच पीएफ खात्यातील बचत त्यांच्या भविष्यासाठी उपयोगात येणार असते. यातला एक भाग कर्मचाऱ्याच्या वेतनातून तर एक भाग कंपनीकडून जमा केला जातो. मात्र, तुम्ही जेव्हा एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाता तेव्हा एक यूएएन (UAN) असूनही पीएफचे अनेक खाते तयार होतात. त्यामुळे तुम्हाला जेव्हा हे पीएफचे पैसे काढायचे असतात तेव्हा या सर्वा खात्यांमधील पैसे एका खात्यात जमा करणं गरजेचं असतं (Know how to merge different PF account in single account).

कंपनी बदलल्याने तयार झालेले वेगवेगळे पीएफ खाते एकत्र करण्यासाठी काही नियम आहेत. त्यामुळे हे नियम समजून न घेता पैसे एका खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केल्यास सगळे पैसे जमा होत नाही. काही भाक वेगवेगळ्या खात्यांमध्येच शिल्लक राहतो. म्हणूनच तुम्हालाही तुमच्या पीएफ खात्यांमधील पैसे एकाच खात्यात ट्रान्सफर करायचे असतील तर खालील बाबी लक्षात ठेवा.

वेगवेगळ्या खात्यातील पैसे एका खात्यावर ट्रान्सफर कसे करायचे?

वेगवेगळ्या खात्यातील पैसे एका खात्यावर ट्रान्सफर करण्यासाठी खातेधारकाला सर्वात आधी मुख्य अकाऊंट सोडून इतर सर्व अकाऊंटमध्ये एक्झिट डेट अपडेट करावी लागेल. यामुळे ईपीएफओला तुम्ही ती नोकरी सोडल्याचं समजतं. ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर Manage ऑप्शनमध्ये जाऊन Mark Exit च्या ऑप्शनमध्ये वर्तमान कंपनी सोडून आधीच्या जुन्या सर्व कंपन्यांच्या पीएफ खात्यांमधून एक्झिट व्हा. यानंतर होम पेजमध्ये Online Services ऑप्शनमध्ये जाऊन One Member – One EPF Account (Transfer Request) वर क्लिक करा. यानंतर टप्प्या-टप्प्याने सूचनांचं पालन करत अकाऊंट ट्रान्सफर करा.

कोणते पैसे सहजासहजी ट्रान्सफर होत नाहीत?

तुम्ही जेव्हा पैसे ट्रान्सफर करतात तेव्हा केवळ ईपीएफचे पैसे ट्रान्सफर होतात. तुमचे पेन्शन फंडचे पैसे ट्रान्सफर होत नाहीत. जेव्हा तुम्ही पेन्शन फंड काढण्यासाठी अर्ज करतात तेव्हाच यासाठी वेगळी व्यवस्था असते. पीएफचे पैसे दोन भागात विभाजित होतात. एक भाग ईपीएफ आणि दुसरा एक भाग पेन्शन फंडात जमा होतो. म्हणूनच सर्व पैसे एकाच खात्यावर जमा करताना तसं झालंय की नाही हे तपासायला हवं.

पैसे ट्रान्सफर व्हायला किती दिवस लागतात?

पीएफ फंड ट्रान्सफर व्हायला 7 से 30 दिवसांपर्यंतचा वेळ लागतो. यासाठी आधी प्रेझेंट कंपनीने त्याला मंजूरी द्यावी लागते, मग पीएफ अकाऊंटची पुढील प्रक्रिया होते.

हेही वाचा :

तुम्ही तुमच्या PF खाते आणि UAN ची माहिती नाहीये? मग ‘या’ ऑनलाईन टीप्सचा वापर करा

सलग 5 वर्षे नोकरीनंतर पीएफ रक्कम काढणं करमुक्त? वाचा सविस्तर…

ऑफिस वेळेशिवाय 30 मिनिटांपेक्षा अधिक काम केल्यास कंपनीला ओव्हरटाईम द्यावा लागणार, काय आहेत नियम?

व्हिडीओ पाहा :

Know how to merge different PF account in single account

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.