BANK HOLIDAY: मार्च महिन्यात ‘या’ तारखांना बँका बंद, वेळेपूर्वीच पूर्ण करा कामं
बहुतांश राज्यांतील बँका महाशिवरात्रीच्या दिवशी बंद राहण्याची शक्यता आहे. सार्वजनिक तसेच खासगी बँकांच्या सुट्ट्यांचे (PUBLIC HOLIDAY) वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीलाच निश्चित केले जाते.
नवी दिल्लीः आगामी (मार्च) महिन्यांत बँकेत महत्वाची कामे असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महत्वाचे सण, राज्य दिवस यामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. मार्च महिन्यात होळी महत्वाचा सण आहे. येत्या 18 मार्चला देशभरात होळी साजरी केली जाईल. होळीच्या (HOLI) दिवशी भारतभरातील बँकांचे कामकाज (BANK HOLIDAY) बंद राहील. महिन्याच्या पहिल्याच दिवशी 1 मार्चला महाशिवरात्रीनिमित्त देखील बँकेला सुट्टी असणार आहे. बहुतांश राज्यांतील बँका महाशिवरात्रीच्या दिवशी बंद राहण्याची शक्यता आहे. सार्वजनिक तसेच खासगी बँकांच्या सुट्ट्यांचे (PUBLIC HOLIDAY) वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीलाच निश्चित केले जाते. राष्ट्रीय सुट्ट्यांसोबत राज्य सरकारकडूनही काही सुट्ट्या घोषित केल्या जातात. त्यासोबतच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांचा कारभार बंद असतो. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुन ग्राहकांना बँकांच्या कारभाराचे नियोजन करावे लागते.
मार्च महिन्यांतील सुट्ट्या:
• 1 मार्च (मंगळवार): महाशिवरात्री • 3 मार्च (गुरुवार): लोसार • 17 मार्च (गुरुवार): होळी दहन (ठराविक राज्यांत सुट्टी) • 18 मार्च (शुक्रवार): होळी/ होळीचा दुसरा दिवस
बँकांना सलग सुट्ट्या:
मार्च महिन्यांत 3 मार्च आणि 4 मार्च म्हणजेच सलग 2 दिवस बँका बंद राहतील. यासोबतच 17 मार्च, 18 मार्च आणि19 मार्च म्हणजेच सलग तीन दिवस देखील बँका बंद राहतील. त्यामुळे बँकेच्या संबंधित तुमचे कोणतेही काम असल्यास वेळेत पूर्ण करा आणि सुट्ट्यांमुळे तुमच्या कामाला विलंब होऊ शकतो.
तुम्ही प्रत्यक्ष बँकेत न जाता तुमची बँक संबंधित कामे ऑनलाईनही पूर्ण करू शकतात. अनेक बँकांनी ग्राहकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. तुम्हाला थेट बँकेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कोविड काळात बँकांची सर्वाधिक कामे ऑनलाईन पूर्ण केली जातात. नेट बँकिंग सेवांवर बँकांच्या सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होत नाही. नेहमीप्रमाणे सेवा सुरू असतात. तुमची बँकिंग कामे वेळेपूर्वीच पूर्ण करा. कारण सुट्टीनंतर बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते.
..नेटबँकिंग करताय सावधान!
सुट्ट्यांच्या काळात किंवा थेट बँकेत जाण्याऐवजी नेटबँकिंगला प्राधान्य दिलं जातं. मात्र, नेटबँकिंग करतेवेळी सावधानता बाळगणं देखील महत्वाचं ठरतं. नेटबँकिंग, एटीएम इत्यादींचा पिन आणि पासवर्ड वापरुन चोरी केली जाते. त्यामुळे बँकिंग पिन आणि पासवर्डशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.तुमचा पासवर्ड सरळमार्गी नको, तो काही प्रमाणात अवघड असणे आवश्यक आहे जेणेकरून इतरांना त्याचा अंदाज येणार नाही. तुम्ही यामध्ये अक्षरे, संख्या आणि विशेष वर्ण (!, @, #, $, %, ^, &, * , ) वापरू शकता.
संबंधित बातम्या