PF UPDATE: पीएफवर टॅक्स ते नवा व्याजदर; सर्व काही जाणून घ्या ‘7’ मुद्द्यांत

पीएफ रकमेबाबत (PF AMMOUNT) व्याजदरासोबतच काही महत्वाचे बदल देखील करण्यात आले आहे. ईपीएफ योगदानावर विशिष्ट टप्प्यानंतर जमा होणारे व्याज करपात्र असणार आहे.

PF UPDATE: पीएफवर टॅक्स ते नवा व्याजदर; सर्व काही जाणून घ्या ‘7’ मुद्द्यांत
PFImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 8:29 PM

नवी दिल्लीः कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संस्थेने (EPFO) वर्ष 2021-22 साठी जमा होणाऱ्या रकमेवर गेल्या महिन्यांत व्याज दराची घोषणा केली. गेल्या वर्षी तुलनेत 0.4 टक्क्यांनी कपात करीत 8.1% पीएफ रकमेवरील नवा व्याजदर असेल. पीएफ रकमेबाबत (PF AMMOUNT) व्याजदरासोबतच काही महत्वाचे बदल देखील करण्यात आले आहे. ईपीएफ योगदानावर विशिष्ट टप्प्यानंतर जमा होणारे व्याज करपात्र असणार आहे. नव्या नियमानुसार पीएफ खात्यांची (PF ACCOUNT) करपात्र योगदान खाती आणि गैर-करपात्र योगदान खाती दोन गटात वर्गवारी केली जाणार आहे. ईपीएफ व्याजावर लागू होणारे नवीन आयकर नियम जाणून घ्या- पॉईंट टू पॉईंट:

1) नवीन नियमांच्या नुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याच्या भविष्य निधी खात्यामध्ये जमा होणारे कोणतेही व्याज केवळ 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या योगदानासाठी कर मुक्त असेल. कर्मचाऱ्यांच्या अडीच लाखांहून अधिक योगदानासाठी कर आकारणी केली जाईल. कर अभ्यासक बलवंत जैन यांच्या मते, आस्थापना कर्मचाऱ्याच्या भविष्य निधीत योगदान करत नसल्यास अशा कर्मचाऱ्यांसाठी कर मुक्त मर्यादा पाच लाख रुपयांची असेल.

2) ईपीएफओ द्वारे प्रत्येक वर्षी जाहीर केलेल्या व्याज दरानुसार, पाच लाखांच्या मर्यादेच्या आत 93 टक्के नोकरदारांचा समावेश होतो आणि त्यांना करमुक्त व्याज लाभ प्राप्त होतो.

3) आस्थापनांद्वारे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के ईपीएफ मध्ये योगदान दिले जाते आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून 12 टक्के कपात केली जाते. आस्थापनांच्या योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेत (ईपीएस) वर्ग केली जाते. सदर रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही.

4) नवीन नियमांत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त योगदानावरील व्याज करपात्र असेल. संपूर्ण योगदान कर आकारणीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.

5) 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा अतिरिक्त रक्कम कर कपातीसाठी पात्र ठरणार नाही. सर्व योगदान गैर करपात्र योगदान म्हणून ग्राह्य धरले जाईल.

6) दुसऱ्या अकाउंटवर (कर योग्य) मिळणाऱ्या खात्यावर प्रत्येक वर्षी कर आकारणी केली जाईल.

7) करपात्र खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर योगदान दिलेल्या वर्षासाठीच केवळ आकारणी केली जाणार नाही. अन्य सर्व वर्षांसाठी कर आकारणी केली जाईल.

संबंधित बातम्या

Happy journey | आता 60 km पर्यंत एकच टोल नाका; तर स्थानिक वाहनधारकांसाठी ही आहे योजना; नितीन गडकरींची घोषणा

ED Raid Shridhar Patankar : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई! महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

ED Raid : ते प्रकरण नेमकं काय ज्याच्यामुळे रश्मी ठाकरेंच्या भावाची ठाण्यातली संपत्ती जप्त करण्यात आलीय?

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.