खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

Petrol & Diesel | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असले तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे तुर्तास सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणे शक्य नाही.

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?
पेट्रोल-डिझेल दर
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 10:22 AM

मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किंमतीमध्ये घसरण होत असताना देशातील इंधनाचे दर अद्यापही चढेच आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत गेल्या 20 दिवसांपासून कोणतीही वाढ झाली नसली तरी हे दर कमीदेखील झालेले नाहीत. एरवी इंधनदरवाढीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे बोट दाखवणारे मोदी सरकार आता मात्र जागतिक बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर घसरुनही ग्राहकांना फायदा का देत नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असले तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे तुर्तास सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणे शक्य नाही. याशिवाय, कोरोनामुळे आर्थिक स्रोत आटल्याने केंद्र सरकार इंधनावरील दरही कमी करण्यास तयार नाही. त्यामुळे तुर्तास नागरिकांना इंधन दरवाढ आणखी काही काळ सहन करावी लागणार आहे. आज सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. इंधनाच्या दरांनी सार्वकालिक उच्चांक गाठल्यामुळे देशातील महागाईत भर पडली आहे.

….तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार

त्या काही दिवसांमध्ये खनिज तेलाचे उत्पादन वाढवण्याचे संकेत ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेकडून देण्यात आले आहेत. तसे घडल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होऊन त्याचा थेट फायदा भारताला मिळेल. परिणामी आगामी दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 5 रुपयांनी खाली येऊ शकतात.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

मुंबई: पेट्रोल- 107.83, डिझेल 97.45 पुणे: पेट्रोल- 107.39, डिझेल 95.71 नाशिक: पेट्रोल- 108.14, डिझेल 95.85 औरंगाबाद: पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69 कोल्हापूर: पेट्रोल- 107.89, डिझेल 95.97

17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

संबंधित बातम्या:

देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.