Government Gold Bond : स्वस्त सोने खरेदीची शेवटची संधी, केंद्र सरकार इतक्या स्वस्तात करत आहे विक्री

Government Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची ग्राहकांना आज शेवटची संधी आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत फिजिकल गोल्डपेक्षा अधिक फायदा मिळतो. तेव्हा ही संधी सोडू नका. मोठा मिळेल फायदा..

Government Gold Bond : स्वस्त सोने खरेदीची शेवटची संधी, केंद्र सरकार इतक्या स्वस्तात करत आहे विक्री
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 3:14 PM

नवी दिल्ली : बाजारात स्वस्तात सोने खरेदी करण्याची आज शेवटची संधी आहे. सॉव्हेरिन गोल्ड बाँड स्कीममधील (Sovereign Gold Bond 2023-24) पहिल्या मालिका संपत आली आहे. पहिल्या दिवशी सोनं खरेदी करता आले नाही तर आज शेवटच्या दिवशी ही संधी दवडू नका. 19 जूनपासून सरकारच्या गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीला सुरुवात झाली आहे. आज 23 जून रोजी ही मालिका बंद होत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत 5,926 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने सोने खरेदी करता येईल. गेल्या सात वर्षांपासून ही योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून अनेक नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे. त्यांना जोरदार परतावा मिळाला आहे.

दुसरा टप्पा केव्हा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणण्यात आली. आता दुसरी मालिका 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान आणण्यात येईल. तोपर्यंत सोन्याच्या भावात काय बदल होतो, हे स्पष्ट होईल. आज सोन्यात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे.

50 रुपयांची सवलत या गोल्ड बाँडमध्ये डिजिटल माध्यमातून पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रत्येक ग्रॅमवर 50 रुपयांची सूट मिळेल. 5,926 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने सोने खरेदी करता येईल. ऑनलाईन खरेदीवर 50 रुपये सवलतीमुळे प्रति ग्रॅम 5,876 रुपये असा भाव असेल. या योजनेत ग्राहकांना 2.5 रुपयांचे वार्षिक व्याज मिळेल. व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी जमा होईल.

हे सुद्धा वाचा

2015 मध्ये या योजनेची सुरुवात 2014 साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. त्यावेळी गोल्ड बाँड आणण्याचे निश्चित करण्यात आले होते. केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना बाजारात उतरवली. दरवर्षी गुंतवणुकीची सुवर्णसंधी मिळते. गोल्ड बाँडचा कालावधी आठ वर्षांसाठी आहे. 2017-18 मधील सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची ही तिसरी मालिका आहे. या मालिकेतून मुदतपूर्व रक्कम काढण्यासाठी 15 एप्रिल, 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली होती.

कोणाला खरेदी करता येईल बाँड सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍यांना 50 रुपयांची सवलत देण्यात येईल.

इतका परतावा या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यापूर्वीच 5 व्या वर्षी योजनेतून बाहेर पडता येते.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.