माझे रेशन अ‍ॅप लाँच; रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे झाली सोपी, जाणून घ्या काय आहेत फायदे

वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेप्रमाणेच आता मोदी सरकारकडून माझे रेशन अ‍ॅपदेखील सुरू करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला रेशनसंदर्भातील सर्व कामे आता ऑनलाईन करता येणार आहेत.

माझे रेशन अ‍ॅप लाँच; रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे झाली सोपी, जाणून घ्या काय आहेत फायदे
रेशन कार्ड
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 10:31 AM

नवी दिल्ली : वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेप्रमाणेच आता मोदी सरकारकडून माझे रेशन अ‍ॅपदेखील सुरू करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला रेशनसंदर्भातील सर्व कामे आता ऑनलाईन करता येणार आहेत. रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते. मात्र ज्यावेळी एखाद्या कुटुंबाचे दुसऱ्या राज्यात स्थलांतर होते. अशावेळी त्याला स्वस्त धान्य मिळण्यास अडचणी येतात. नेमक्या याच अडचणी आता या अ‍ॅपच्या माध्यमातून दूर होणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

‘ही’ कामे करता येणार 

माझे रेशन अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही नव्या रेशन कार्डसाठी नोंदणी करू शकता, नवे रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता. तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते देखील पाहू शकता. आधार जर लिंक नसेल तर तुम्ही स्व:ता तुमचे आधार अ‍ॅपचा वापर करून रेशन कार्डला जोडू शकता. यासोबतच आतापर्यंत तुम्हाला किती धान्य वितरीत करण्य़ात आले आहे, तुमच्या जवळ कुठे-कुठे स्वस्त धान्य दुकान आहे? याची माहिती देखील तुम्हाला मिळू शकते. जर तुम्हाला तुमचा स्वस्त धान्य दुकानदार बदलायचा असेल तर तो देखील तुम्ही या अ‍ॅपच्या मदतीने बदलू शकता.

वेळ आणि पैशांची बचत 

माझे रेशन अ‍ॅप हे नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोनही वाचणार आहे. रेशन कार्ड काढायचे झाल्यास किंवा त्याची नोंदणी करायची झाल्यास मोठ्याप्रमाणात कागदपत्रे सादर करावे लागत होते. तसेच त्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागत होते. मात्र आता तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटांमध्ये कमीत कमी कागदपत्रांमध्ये नोंदणी करू शकणार आहात. तसेच रेशन कार्ड तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी बराच कालावधी लागत होता. मात्र आता या अ‍ॅपमधूनच ते डाऊनलोड होणार असल्याने वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. सोबतच तुम्ही जर इतर राज्यात स्थलांतर केले तर, या अ‍ॅपवर स्थलांतरणाचा देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.  त्यावर जाऊन तुम्ही राज्याची आणि शहराची नोंदणी केली की तुम्हाला राशन मिळू शकते.

संबंधित बातम्या 

Gold Price Today: सोने पुन्हा एकदा महागले, चांदी स्वस्त, पटापट तपासा भाव

नोकरदार ‘या’ 4 ठिकाणी गुंतवणूक करणार, करबचतीसह मोठा नफा मिळणार

रेल्वे 1.5 लाख तरुणांना देणार नोकऱ्या, कोणत्या दिवशी RRB NTPC लेव्हल-1 चा निकाल?

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.